Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहरातील २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला विविध...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहरातील २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

पिंपरी, दिनांक – १९ डिसेंबर २०२३ :- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग नोंदविला तसेच उपक्रमांची माहिती घेऊन कल्याणकारी योजनांचा लाभही घेतला. आतापर्यंत शहरातील २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेतला आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाद्वारे केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभागातील नागरिकांना देण्यात येणार आहे. शहराच्या प्रमुख ६७ ठिकाणी या यात्रेद्वारे जनजागृती करण्यात येणार असून यामध्ये प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, आयुष्मान भारत कार्ड, आधार कार्ड अद्यावतीकरण, उज्ज्वला गॅस या योजनांची माहिती तसेच लाभ नागरिकांना थेट प्रकारे दिले जात आहेत.

विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, कुष्ठरोग, हिमोग्लोबीन, मलेरिया, डेंग्यू तसेच इतर रोगांच्या तपासण्या मोफत करण्यात येत आहेत.

१९ डिसेंबरपर्यंत शहरातील ४४ ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला असून २८ नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेला सुरूवात झाली होती. या संकल्प यात्रेत लोकप्रतिनिधींसह विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होत आहेत तसेच नागरिकांना विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

केंद्र शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा वाहनामार्फत नागरिकांना मार्गदर्शन करणारे विविध कक्ष उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी वाहनाला भेट देऊन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments