Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedखडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान जागृतीसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन*

खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान जागृतीसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन*

*
पुणे, दि. 22: खडकवासला विधानसभा मतदारसंघात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत श्री शरदचंद्रजी पवार ॲकॅडमी ऑफ ई- लर्निग स्कूल, वडगांव बुद्रुक तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाच्या ज्ञानसाधना विद्यामंदीर, जाधवनगर, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक येथील विद्यार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी खडकवासला स्वीप समन्वयक शरदचंद्र गव्हाळे यांनी मतदान प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातील सर्व ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्वीप पथक सदस्य निखिल सांगडे, रुपाली परिहर, एस.एस. परळीकर, प्रगती मोरे, मनीषा भोंगळे, उषा मुंढे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments