Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑल न्यू निसान टेक्टॉनचे जागतिक अनावरण: अद्वितीयत्वाचा गौरव

ऑल न्यू निसान टेक्टॉनचे जागतिक अनावरण: अद्वितीयत्वाचा गौरव

 

 

• भारतात जागतिक प्रीमियर: निसान मोटर इंडियाने आपल्या भारतातील पुनरुत्थान धोरणाचा भाग म्हणून आपली प्रीमियम सी-एसयूव्ही ऑल-न्यू निसान टेक्टॉन सादर केली आहे.

• प्रसिद्ध निसान पेट्रोलपासून प्रेरित डिझाइन: ऑल-न्यू टेक्टॉन बाजारात क्रांती घडवण्यासाठी डिझाइन केली आहे. निसानच्या स्वतःच्या सर्वोत्कृष्ट, प्रसिद्ध निसान पेट्रोलपासून प्रेरित असलेली ही गाडी निसान एसयूव्हीच्या ७५ वर्षांच्या उत्कृष्टतेचे प्रदर्शन घडवते.

• क्रांतीकारक डिझाइन: निसान टेक्टॉन हे एक उत्कृष्ट पॅकेज आहे. ते अद्वितीय ऐषाराम, रोमांचक कामगिरी आणि गूगलच्या बिल्ट-इन कनेक्टिव्हिटीसह अखंड कनेक्टिव्हिटी आणते.

• निर्विवाद कनेक्टिव्हिटी: गूगल बिल्ट-इन एक अखंड कनेक्टेड अनुभव देते. त्यामुळे ग्राहक गूगल मॅप्सद्वारे आत्मविश्वासाने मार्ग शोधू शकतात, गूगल असिस्टंटसह हँड्स-फ्री आणि गूगल प्लेसोबत २०० हून अधिक ॲप्स वापरू शकतात.

• निर्विवाद ड्रायव्हिंगचा अनुभव: टेक्टॉन १००% टर्बोचार्ज्ड इंजिन लाइन-अपमध्ये उपलब्ध आहे. त्यात टर्बो टी१६० आणि टर्बो टी२८० पर्याय १६३ पीएसपर्यंत ऊर्जा आणि २८० एनएम टॉर्क मिळतो. टर्बो टी२८० ही ई-शिफ्टरसह ६-स्पीड वेट क्लच डीसीटीमध्ये उपलब्ध असून आत्मविश्वास, स्थैर्य आणि नियंत्रणासह रोमांचक कामगिरी देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

• निसानच्या पुनरुत्थानासाठी महत्त्वाची: ऑल न्यू निसान टेक्टॉन हे २०२६ मधील ब्रँडचे दुसरे उत्पादन असून भारतातील निसानच्या पुनरुत्थानाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे.

 

मुंबई, ९ जुलै २०२६: निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एनएमआयपीएल) आज भारतात आपल्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये ऑल न्यू निसान टेक्टॉन XX लाख रूपये इतक्या प्रारंभीच्या किमतीत आणली असून ती कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या उत्पादनाच्या घोडदौडीतील एक महत्त्वाचा क्षण आहे. ही प्रीमियम सी-एसयूव्ही तिच्या सेगमेंटमधील एकमेव मॉडेल असून ती संपूर्ण रेंजमध्ये १००% टर्बोचार्ज्ड इंजिन लाइन-अप देते. तसेच यात श्रेणीतील सर्वोत्तम अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यात सेगमेंट-लीडिंग २८० एनएम टर्बो परफॉर्मन्स, गूगल बिल्ट-इन कनेक्टिव्हिटी आणि क्लास-लीडिंग ७०० लिटरची बूट स्पेस यांचा समावेश आहे.

 

मॅन्युअल आणि डीसीटी गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध असलेल्या टी२८० रेंजची किंमत XX लाख रूपयांपासून सुरू होते.

 

टी१६० रेंजची किंमत XX लाख रूपयांपासून सुरू होते.

 

टेक्टॉनच्या माध्यमातून निसान भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक गतिमान आणि स्पर्धात्मक श्रेणीतील एकात आपल्या एसयूव्ही डीएनएचे एक नवीन रूप आणत आहे. चेन्नई येथील कारखान्यात उत्पादित आणि ब्रँडच्या ‘वन कार, वन वर्ल्ड’ या तत्त्वज्ञानानुसार विकसित केलेली टेक्टॉन भारतीय ग्राहकांच्या सेवेत दाखल होईल आणि जगभरातील अनेक बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाईल. त्यामुळे निसानच्या जागतिक उत्पादन आणि उत्पादन धोरणामध्ये भारताची वाढती भूमिका अधिक मजबूत होईल.

 

जागतिक प्रीमियरप्रसंगी बोलताना निसानचे मुख्य कामगिरी अधिकारी गुइलॉम कार्टियर म्हणाले, “आम्ही भारतात एक अधिक मजबूत आणि स्पर्धात्मक निसान आणत आहोत. आम्ही आमचा एसयूव्हीवर आधारित पोर्टफोलिओ अधिक मजबूत करत असताना आणि बाजारावरील आमचे लक्ष अधिक केंद्रित करत असताना ऑल न्यू निसान टेक्टॉनचे जागतिक अनावरण जागतिक उत्पादन सामर्थ्याला स्थानिक उपयुक्ततेसोबत जोडण्याची आमची महत्त्वाकांक्षा दर्शवतो. टेक्टॉन हे निसान एका अधिक स्पर्धात्मक, भविष्यासाठी सज्ज पोर्टफोलिओच्या दिशेने हेतुपूर्वक परिवर्तन घडवत असल्याचे प्रदर्शन आहे.”

 

निसानच्या एएमआयईओ विभागाचे अध्यक्ष, मॅसिमिलियानो मेसिना म्हणाले, “भारत सर्व बाजारपेठा आणि प्रदेशांमध्ये निसानच्या वाढीला चालना देत आहे. टेक्टॉन हे आमच्या ‘वन कार, वन वर्ल्ड’ या दृष्टिकोनाचे एक उत्तम उदाहरण आहे – एक जागतिक उत्पादन ज्याचे उत्पादन भारतात भारतीय ग्राहकांसाठी केले आहे आणि या प्रदेशातील निर्यात बाजारपेठांसाठी विकसित केले आहे. हे निसानसाठी विकासाचे इंजिन आणि एसयूव्ही उत्पादन केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करते.”

 

ऑल न्यू टेक्टॉन ही केवळ एक नवीन सी-एसयूव्ही नाही. ती भारतातील निसानच्या पुढील वाटचालीचा एक प्रमुख पुरावा आहे – एक असे उत्पादन जे ग्राहकांचा विचार वाढवण्यासाठी, ब्रँडची एसयूव्ही म्हणून असलेली ओळख अधिक मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक प्रीमियम, वैशिष्ट्यपूर्ण व तंत्रज्ञानावर आधारित निसान अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

थिएरी सब्बाग, उपाध्यक्ष तसेच अध्यक्ष, मध्य पूर्व, केएसए, भारत, सीआयएस – निसान आणि इन्फिनिटी, म्हणाले, “टेक्टॉन हे आमच्या क्षमतेचे एक सशक्त प्रतीक आहे. ते जागतिक एसयूव्हीची उत्कृष्टता भारतात आणत आहे. ऑल न्यू ग्रॅव्हाइटच्या अनावरणानंतर ऑल न्यू निसान टेक्टॉनचे जागतिक अनावरण आमच्या प्रगतीच्या प्रवासाला गती देते आणि भारतातील आमचा एसयूव्ही पोर्टफोलिओ अधिक मजबूत करते. टेक्टॉनमध्ये आकर्षक डिझाइन, प्रीमियम वैशिष्ट्ये, प्रगत तंत्रज्ञान आणि एसयूव्हीचे दमदार स्वरूप एकत्र आले असून ते ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांशी सुसंगत आहे.”

 

संपूर्ण वर्चस्व

प्रसिद्ध निसान पेट्रोलपासून प्रेरित असलेली टेक्टॉन एका आकर्षक आणि निर्विवाद डिझाइन शैलीसह निसानचा एसयूव्ही वारसा पुढे घेऊन जाते. आकर्षक डिझाइन असलेली टेक्टॉन प्रीमियम अस्तित्व, एक प्रभावी बाह्यरेखा आणि दमदार वेग यांचा मिलाफ साधते.

 

आकर्षक आणि सुबक रचना, रेखीव रेषा, दमदार व्हील आर्च, एअरो-ट्यून स्पॉयलर्स, फ्लश रूफ रेल्स, पेट्रोलवर आधारित संपूर्ण रुंदीची क्रोम ॲक्सेंट ग्रिल, डबल-सी कॉन्ट्रास्ट स्किड प्लेट आणि सिग्नेचर सी-आकाराचे ५-चेंबर एलईडी कनेक्टिंग हेडलॅम्प्स तिला रस्त्यावर एक प्रभावी ओळख देतात.

 

टेक्टॉनमध्ये मागील बाजूस सिन्क्रोफ्लो सी-आकाराच्या कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्ससह दमदार प्रमाणबद्धता आणि ठळक स्टायलिंग आहे, तर पियानो ब्लॅकमधील मॅजेस्टिक हिमालयन क्रेस्ट साहसी वृत्तीचा गौरव करते. बाजारात बदल घडवण्यासाठी डिझाइन केलेली टेक्टॉन प्रभावी प्रमाणबद्धता आणि सुंदर तपशील एका पॅकेजमध्ये एकत्र आणते. ते त्वरित आपली छाप पाडते.

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित करणे, नेटवर्कचा विस्तार आणि भारतीय ग्राहकांसाठी महत्त्वाच्या गोष्टींची सखोल समज यांमुळे भारतात निसानची प्रगती वेगाने होत आहे. टेक्टॉन हे निसानच्या भारतातील पुनरुत्थानाचे प्रमुख उदाहरण आहे. हे वाहन ‘मेड इन इंडिया’ असून जगासाठी सज्ज आहे आणि ते प्रभावी अस्तित्व, निर्विवाद लक्झरी, इंटेलिजेंट टेक्नॉलॉजी, आत्मविश्वासपूर्ण कामगिरी आणि दैनंदिन उपयुक्तता प्रदान करते.”

 

निर्विवाद आराम

टेक्टॉन आपल्या ड्रायव्हरकेंद्री रॅपअराउंड केबिनमध्ये प्रीमियम लेदरेट, सॉफ्ट-टच फिनिशेस, खास स्टिचिंग आणि जपानी कारागिरीच्या संगमातून एका सुखद ट्राय-टोन अनुभवासह लक्झरीची नवीन व्याख्या करते.

 

प्रीमियम बेज, बरगंडी आणि रोझ गोल्डच्या अॅक्सेंटसह असलेले ट्राय-टोन इंटिरियर्स, समकालीन अभिजात सौंदर्य आणि तपशिलाकडे असलेले लक्ष दर्शवतात. रोझ गोल्ड हॉरिझॉन्टल डबल-बार फिनिशरने सुशोभित केलेले निसानचे चिन्ह केबिनमधील सौंदर्यात आणखी भर घालते.

 

टेक्टॉनच्या कमांड सेंटरची रचना संपूर्ण नियंत्रणासाठी केलेली आहे. त्यात डबल डी-कट स्टीयरिंग, चालकावर लक्ष केंद्रित करणारे दोन डिजिटल स्क्रीन्स, फ्लाय-बाय-वायर ई-शिफ्टरसह एक उंच सेंटर कन्सोल आणि वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक नियंत्रणांचा संपूर्ण संच आहे. शक्तिशाली, हवेशीर आणि कमरेला आधार देणाऱ्या शरीररचना आधारासह असलेल्या ॲक्टिव्ह कम्फर्ट सीट्स, तसेच ॲडजस्टेबल बूमरँग प्रोफाइल हेडरेस्ट्स प्रत्येक ड्रायव्हिंगचा अनुभव अपवादात्मकरित्या आरामदायी करतात.

केबिनची रचना दैनंदिन वापरासाठीच्या अत्याधुनिकतेवर लक्ष केंद्रित करून केली आहे. ती अत्यंत आकर्षक आहे, आधुनिक कौटुंबिक जीवनाला साजेसी आहे आणि प्रत्येक ड्रायव्हिंगचा अनुभव सहजसोपा वाटावा इतकी सहज आहे.

 

अचूक नियंत्रण, आराम आणि दैनंदिन उपयुक्तता

टेक्टॉन आकर्षक एसयूव्हीचे प्रमाणशीर अस्तित्व रोजच्या उपयुक्ततेशी जोडते. रस्त्यावरील उत्तम दृश्यमानता, २१२ मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि सेगमेंटमधील सर्वोत्तम अप्रोच व डिपार्चर अँगलसह टेक्टॉनची रचना शहरात, महामार्गांवर आणि आव्हानात्मक रस्त्यांवर आत्मविश्वास देण्यासाठी केली आहे.

 

टेक्टॉन सर्वोत्तम स्टोरेज आणि उपयुक्ततादेखील देते. यात ७०० लिटरपर्यंत बूट स्पेस उपलब्ध आहे. त्यात एक अशी फ्लॅगशिप सी-टी आहे जी केवळ दिसायलाच प्रभावी नाही, तर कुटुंबे, लांबचे प्रवास आणि दैनंदिन भारतीय वापरासाठी सहजतेने काम करते.

 

अचूक ड्रायव्हिंगचा अनुभव

न्यू टेक्टॉन आत्मविश्वास, स्थैर्य आणि नियंत्रणासह रोमांचक कामगिरी देते. ग्राहक टर्बो टी१६० आणि टर्बो टी२८० इंजिनच्या १००% टर्बोचार्ज्ड श्रेणीमधून निवड करू शकतात. त्यात टर्बो टी२८० १६३ पीएसपर्यंतची शक्ती आणि २८० एनएम टॉर्क देते.

 

टर्बो टी१६० हे दैनंदिन कामगिरी, सुलभता आणि १९.४ किमी/लीटरच्या अपवादात्मक कार्यक्षमतेसाठी तयार केले आहे तर टर्बो टी२८० हे सहज कामगिरी आणि परिष्कृत आरामासाठी बनवले आहे. त्यात १८.५ किमी/लीटरची इंधन कार्यक्षमता आहे.

दोन्ही इंजिनांमध्ये निसान जीटी-आर-प्रेरित मिरर बोर कोटिंग तंत्रज्ञान आहे. त्याची रचना अंतर्गत घर्षण कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता व कामगिरी सुधारण्यासाठी केली आहे. ६-स्पीड डीसीटी जलद, प्रतिसादात्मक गिअर शिफ्ट्स देते आणि ते भारतीय ड्रायव्हिंग परिस्थितीसाठी अत्यंत अनुकूल आहे, तर ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन जास्तीत जास्त नियंत्रण पसंत करणाऱ्या चालकांसाठी अचूक नियंत्रण देते करते.

 

टेक्टॉनमध्ये खास मूड लायटिंगसह ड्युअल-ड्राइव्ह मोड देखील आहे. त्यामुळे चालकांना त्यांच्या इच्छेनुसार ड्रायव्हिंग करण्याची पद्धत निवडता येते. ड्युअल-मोड स्टीयरिंगमुळे चालकांना टेक-लिंक एचडी इन्फोटेनमेंट सिस्टमद्वारे शहरात गाडी चालवण्यासाठी कमी प्रयत्न आणि हाय-स्पीड क्रूझिंगसाठी जास्त प्रयत्न निवडता येतात. ट्यून केलेले शॉक ॲबसॉर्बर्स आणि ड्युअल अँटी-रोल बार्स सर्व वेगांवर स्थैर्य देतात. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या रस्त्यांवर उत्कृष्ट राइड आणि हँडलिंग मिळते.

 

अचूक कनेक्टिव्हिटी

टेक्टॉनचे टेक्नॉलॉजी पॅकेज मालकीचा अनुभव अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी आहे. या सी-एसयूव्हीमध्ये ड्युअल-स्क्रीन लेआउट असून त्यात गूगल इनबिल्ट असलेली २५.६५ सेमी (१०.१ इंच) टेक-लिंक एचडी इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि २६.०३ सेमी (१०.२५ इंच) एचडी डिजिटल कॉकपिट आहे. ते माहिती, मनोरंजन आणि वाहनाविषयीची सखोल माहिती एकाच सहज वापरता येणाऱ्या डिजिटल कमांड सेंटरमध्ये एकत्र आणते.

 

टेक्टॉन गूगल बिल्ट-इन आणि मायनिसान ॲपद्वारे ५५+ कनेक्टेड वैशिष्ट्यांसह या श्रेणीतील सर्वात प्रगत कनेक्टेड अनुभवांपैकी एक देते. ग्राहकांना गूगल मॅप्स, गूगल असिस्टंट आणि गूगल प्लेचा थेट ॲक्सेस मिळतो. तसेच नेव्हिगेशन, संगीत, मनोरंजन आणि इतर इन-कार अनुभवांसाठी २०० हून अधिक ॲप्सचा ॲक्सेस मिळतो.

 

गूगल असिस्टंट नेव्हिगेशन, मीडिया, फोन फंक्शन्स, कनेक्टेड सर्व्हिसेस आणि एअर कंडिशनिंगसारख्या वाहन नियंत्रणांसाठी नैसर्गिक व्हॉइस कमांड्स सक्षम करते. त्यामुळे ग्राहकांना वाहनाशी अधिक सहजतेने संवाद साधण्यास मदत होते. गूगल मॅप्स लाइव्ह नेव्हिगेशन, रहदारीची माहिती आणि अखंड नकाशा अपडेट्स सक्षम करते. तसेच दैनंदिन ड्रायव्हिंग सोपे करण्यासाठी नेव्हिगेशन डिजिटल क्लस्टरवर देखील प्रदर्शित केले जाऊ शकते.

 

टेक्टॉन ग्राहकांना त्यांच्या गूगल खात्याद्वारे साइन इन करण्याची परवानगी देऊन गाडीचे वैयक्तिकीकरण शक्य करते. त्यामुळे त्यांना केवळ ॲप्सशीच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक पसंतींशीही जोडले जाण्यास मदत होते.

 

टेक्नॉलॉजी पॅकेजमध्ये इन्फिनिटी व्ह्यू पॅनोरामिक सनरूफ, व्हॉइस-असिस्टेड ड्युअल-झोन एअर कंडिशनिंगसह इंटेलिजेंट क्लायमेट कंट्रोल, ड्युअल स्क्रीन्स, डॅशबोर्ड आणि दारांवर ४८ रंगांसह पर्सनलाइज्ड मूड लायटिंग, अर्कामिस ३डी ऑडिटोरियम सराउंड साउंड सिस्टीम, ॲक्टिव्ह-कूल्ड वायरलेस चार्जर आणि प्लाझ्माक्लस्टर आयनायझर व AQI डिस्प्लेसह स्मार्ट एअर प्युरिफायर यांचाही समावेश आहे.

 

अतुलनीय सुलभता

टेक्टॉन प्रत्येक बाबतीत एक विश्वासू सोबती म्हणून तयार करण्यात आली आहे. अँटी-पिंचसह स्मार्ट पावर्ड टेलगेट कार्गो वन टचमध्ये शक्य होते. जड वस्तू उचलणे टाळण्यासाठी गाडीला कमी उंचीच्या लोडिंग एजचा आधार आहे.

 

अ‍ॅप्रोच अनलॉक आणि वॉकअवे लॉकसह इंटेलिजेंट अ‍ॅक्सेस ग्राहकांचे सहजपणे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठी डिझाइन केले आहे. अतिरिक्त सोयीसुविधांमध्ये ३६०-डिग्री पार्किंग असिस्ट, ३डी इंटेलिजेंट अराउंड व्ह्यू मॉनिटर, अ‍ॅक्टिव्ह-कूल्ड वायरलेस चार्जिंग आणि मायनिसान अ‍ॅपद्वारे कनेक्टेड फीचर्स यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहक कुठेही असले तरी त्यांना आपल्या टेक्टॉनवर अधिक नियंत्रण मिळते.

 

अतुलनीय सुरक्षा

ऑल न्यू निसान टेक्टॉन सर्वोच्च पातळीच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आली असून त्यात ६ एअरबॅग्ज, ४०+ स्टँडर्ड सुरक्षा वैशिष्ट्ये आणि ६२% उच्च-शक्तीच्या स्टीलची मोनोकॉक फ्रेम मानक स्वरूपात आहे. याची ६-एअरबॅग शील्ड सिस्टीम स्टँडर्ड म्हणून येते. ती केबिनमधील प्रवाशांना संरक्षण देते तर ६२% उच्च-शक्तीचे स्टील आणि ए व बी पिलर्समधील अति-उच्च-शक्तीचे स्टील मिळून मोनोकॉक बॉडी शेल तयार होते. त्यामुळे अधिक शक्ती, स्थैर्य आणि सुरक्षितता मिळते.

 

टेक्टॉनच्या प्रगत सुरक्षा पॅकेजमध्ये १७+ एडीएएसवैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. त्यात स्टॉप अँड गो सह अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग, ड्रायव्हर अटेंशन अलर्ट आणि ट्रॅफिक साइन रेकग्निशन यांचा समावेश आहे. तिला ३६०-डिग्री पार्किंग असिस्ट आणि ३डी इंटेलिजेंट अराउंड व्ह्यू मॉनिटरचा आधार आहे. त्यामुळे चालकांना ३६०-अंशात गाडीच्या आजूबाजूची स्थिती पाहता येते.

टेक्टॉन ग्राहकांना त्यांना सक्रिय करायचे असलेले एडीएएस फंक्शन्स निवडण्याची मुभा देऊन सुरक्षेत वैयक्तिकरण वाढवते. त्यामुळे त्यांना त्यांच्या ड्रायव्हिंग अनुभवावर अधिक नियंत्रण मिळते.

 

एक कार, एक जग

चेन्नई येथील प्लांटमध्ये उत्पादित झालेल्या टेक्टॉन निसानच्या “एक कार, एक जग” या तत्त्वज्ञानाअंतर्गत मध्य पूर्व आणि आफ्रिका यांसारख्या बाजारपेठांमध्ये निर्यात केली जाईल. त्यातून निसानच्या उत्पादन, निर्यात आणि उत्पादन धोरणामध्ये भारताचे वाढते महत्त्व दिसते.

 

बुकिंग सुरू

न्यू निसान टेक्टॉनसाठी भारतातील निसानच्या रिटेल नेटवर्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर बुकिंग आता सुरू झाले आहे.

 

न्यू टेक्टॉनच्या जागतिक अनावरणासह निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एक खास सी-एसयूव्ही सादर करत आहे. ती पेट्रोल-प्रेरित डिझाइन, जपानी कारागिरी, २००+ ॲप्ससह गूगलची अंगभूत कनेक्टिव्हिटी, प्रगत सुरक्षा, टर्बोचार्ज्ड परफॉर्मन्स आणि ‘मेड-इन-इंडिया’ची जागतिक ओळख एकत्र आणते.

 

टेक्टॉन ही सी-एसयूव्ही श्रेणीच्या केंद्रस्थानी आपले वेगळेपण जपण्यासाठी आणि भारतातील निसानच्या प्रगतीच्या पुढील अध्यायाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

 

प्रसारमाध्यमांसाठी

अधिक माहितीसाठी, कृपया www.nissan.in ला भेट द्या

निसान अमिओबाबत (आफ्रिका, मध्य पूर्व, भारत, युरोप आणि ओशनिया)

निसान आपल्या ‘दैनंदिन जीवनासाठी गतिशील बुद्धिमत्ता’ या दीर्घकालीन दृष्टिकोनाने प्रेरित आहे. तो गतिशीलता अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि सुलभ बनवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान दैनंदिन अनुभवांमध्ये आणतो. ग्राहककेंद्री दृष्टिकोन आणि नाविन्यावर लक्ष केंद्रित करून निसान लोकांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल घडवत आहे आणि अधिक संरचित, सहज आणि समाधानकारक गतिशीलतेचे अनुभव निर्माण करत आहे.

 

हा दृष्टिकोन पुढे नेण्यात अमिओ प्रदेश महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आपल्या विविध बाजारपेठांमध्ये निसान विद्युतीकृत गतिशीलतेची उपलब्धता वाढवत आहे, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर करत आहे आणि ग्राहकांना मूल्य प्रदान करणाऱ्या व शाश्वत वाढीस चालना देणाऱ्या धोरणात्मक भागीदारी निर्माण करत आहे.

 

निसानची उत्पादने, सेवा आणि बुद्धिमान गतिशीलतेप्रती असलेल्या वचनबद्धतेबद्दल अधिक माहितीसाठी nissan-global.com ला भेट द्या. तुम्ही आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि लिंक्डइनवर फॉलो करू शकता आणि आमचे सर्व नवीन व्हिडिओ यूट्यूबवर पाहू शकता.

 

प्रसारमाध्यमांच्या पुढील चौकशीसाठी येथे संपर्क साधता येईल:

गगन मंगल

जनसंपर्क प्रमुख

निसान मोटर इंडिया प्रा. लि.

ईमेल: media.comms@email.nissan.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments