▪️
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत यांनी आज पुण्यातील नऱ्हे तेथील शिवसृष्टीला भेट दिली. नऱ्हे आंबेगाव येथे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले. यावेळी त्यांचे सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. शिवसृष्टीच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.


