Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedसक्षमीकरणाचा प्रवास - टाटा मोटर्सला इलेक्ट्रिक वेईकल्‍सचा अवलंब करणाऱ्या महिलांमधील वाढता उत्‍साह...

सक्षमीकरणाचा प्रवास – टाटा मोटर्सला इलेक्ट्रिक वेईकल्‍सचा अवलंब करणाऱ्या महिलांमधील वाढता उत्‍साह पाहून आनंद झाला आहे

डिसेंबर १९, २०२३: भारतात इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या वाढत्‍या अवलंबतेचे श्रेय महिला ग्राहकांमध्‍ये ईव्‍हींप्रती वाढत्‍या पसंतीला जाते, ज्‍यामधून ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रातील प्रगतीशील परिवर्तन दिसून येते. TATA.ev (टाटा मोटर्स) ने इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्‍यामुळे नाविन्‍यपूर्ण सुधारणा आणि शाश्‍वत गतीशीलतेप्रती कटिबद्धतेच्‍या माध्‍यमातून मोठ्या प्रमाणात अवलंबतेला चालना मिळत आहे. टाटा मोटर्सच्‍या ईव्‍हींच्‍या विक्रीमध्‍ये सतत प्रभावी वार्षिक वाढ दिसण्‍यात येत आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्‍ये कंपनीने ४८,००० हून अधिक ईव्‍हींची विक्री केली, तसेच आर्थिक वर्ष २४ च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये ३७,००० हून अधिक ईव्‍हींची विक्री केली आहे. या आकडेवारीमधून ईव्‍हींसाठी वाढती मागणी दिसून येते, जेथे बाजारपेठेत मागणी वाढत असून ईव्‍हींच्‍या अवलंबतेमध्‍ये येणारे अडथळे कमी होत आहेत.

TATA.ev चा अलिकडील डेटा, विश्‍लेषण व ग्राहक अभिप्रायाने ईव्‍हींचे उल्‍लेखनीय यश व ईव्‍हींप्रती वाढती रूची यावर प्रकाश टाकला, जेथे विविध घटक ऑटोमोटिव्‍ह क्षेत्राला नवीन आकार देत आहेत. रोचक बाब म्‍हणजे Tiago.ev चे २२ टक्‍के ग्राहक महिला आहेत, जे चार-चाकींसाठी उद्योगामधील सरासरी प्रमाणापेक्षा दुप्‍पट आहे. ईव्‍ही प्रदान करणारे आधुनिक वैशिष्‍ट्य व सुधारित आरामदायीपणामुळे हा ट्रेण्‍ड प्रबळपणे वाढत आहे, ज्‍यामुळे ईव्‍ही लक्षवेधक मूल्‍य तत्त्व बनत आहे.

TATA.ev द्वारे रोचक ट्रेण्‍ड्स:

ईव्‍हींप्रती महिलांमधील वाढत्‍या रूचीला चालना देणाऱ्या प्रमुख घटकांमध्‍ये नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये आणि इलेक्ट्रिक वेईकल तंत्रज्ञानामधील सुधारणा, तसेच ईव्‍ही चालवण्‍याचा किफायतशीरपणा यांचा समावेश आहे, ज्‍यामुळे शाश्‍वत व आधुनिक परिवहन सोल्‍यूशन्‍सचा शोध घेणाऱ्या महिलांसाठी ईव्‍ही आकर्षक पर्याय बनली आहे.
उल्‍लेखनीय ट्रेण्‍ड म्‍हणजे टाटा मोटर्सच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या १९ टक्‍के महिला ग्राहक पहिल्‍यांदाच कार खरेदीदार आहेत. यामधून महिला विकसित होत असलेल्‍या बाजारपेठ विभागाला देत असलेले प्राधान्‍य दिसून येते, ज्‍या त्‍यांच्‍या सुरूवातीच्‍या ऑटोमोटिव्‍ह अनुभवासाठी इलेक्ट्रिक गतीशीलतेचा अवलंब करत आहेत.
टाटा मोटर्ससाठी एकूण ईव्‍ही ग्राहकांपैकी २२ टक्‍के ग्राहक महिला आहेत; या आकडेवारीमधून टाटा ईव्‍हींची सर्वसमावेशक अपील दिसून येते, तसेच महिला ग्राहक फायदे व वैशिष्‍ट्यांना प्राधान्‍य देत असल्‍याचे निदर्शनास येते. विविध पसंती व आवश्‍यकतांची पूर्तता करणाऱ्या टाटा मोटर्स ईव्‍हींच्‍या वैविध्‍यपूर्ण श्रेणीने महिला ग्राहकांमधील हा उल्‍लेखनीय मार्केट शेअर संपादित करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ईव्‍ही विक्रीबाबत प्रादेशिक ट्रेण्‍ड्स: विक्री ट्रेण्‍ड्सनुसार एकूण विक्रीमध्‍ये सर्वोच्‍च ईव्‍ही प्रमाण असलेले टॉप तीन प्रदेश आहेत:
1. केरळ: एकूण ईव्‍ही विक्रीमध्‍ये प्रभावी ३५ टक्‍क्‍यांच्‍या योगदानासह यादीमध्ये अव्‍वलस्‍थानी आहे.

2. गोवा: ईव्‍ही बाजारपेठेत २६ टक्‍क्‍यांच्‍या योगदानासह दुसऱ्या स्‍थानावर आहे.

3. चंदिगड: ईव्‍ही विक्रीत २१ टक्‍क्‍यांच्‍या योगदानासह तिसऱ्या स्‍थानावर आहे.

या प्रादेशिक ट्रेण्‍ड्समधून विविध भौगोलिक ठिकाणी टाटा मोटर्सच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍सची व्‍यापक स्‍वीकृती व लोकप्रियता दिसून येते.

TATA.ev भावी शाश्वत गतीशीलतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे आणि इलेक्ट्रिक वेईकल्‍सप्रती महिला ग्राहकांमधील वाढता उत्‍साह पाहून आनंदित आहे. या विभागामधील यशामधून कंपनीची नाविन्‍यता, तंत्रज्ञानाप्रती तसेच सर्वांना हरित व अधिक सुलभ भविष्‍य प्रदान करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments