Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedबेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून कामासाठी १० लाखांपर्यंतची कामे विनानिविदा प्रस्ताव सादर...

बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून कामासाठी १० लाखांपर्यंतची कामे विनानिविदा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २० : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत कार्यालयाकडे प्राप्त होणारी १० लाख रूपयापर्यंतची विनानिविदा कामे बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामवाटप समितीमार्फत वितरित करण्यात येतात. २०२६-२७ या आर्थिक वर्षात प्राप्त होणाऱ्या कामांच्या वाटपासाठी मुंबई शहर जिल्ह्यात कार्यरत व नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

इच्छुक संस्थांनी संस्थेच्या लेटरहेडवर प्रस्तावासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, सर्व सभासदांची अद्ययावत यादी, २०२३-२४ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडून ३१ जुलै, २०२६ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर येथे प्रस्ताव सादर करावेत.

याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक संस्थांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments