कल्याण ज्वेलर्सचे बारामतीतील हे भव्य पदार्पण परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम घडवून आणत, ग्राहकांना दोन्ही प्रकारच्या सर्वोत्तम दागिन्यांच्या खरेदीची सुवर्णसंधी देणार आहे
बारामती, २० जुलै, २०२६: भारतातील एक सर्वात विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड, कल्याण ज्वेलर्सने बारामतीमध्ये आपले पहिले शोरूम सुरु करून, महाराष्ट्रातील रिटेल विस्ताराच्या घोडदौडीत एक लक्षणीय टप्पा गाठला आहे. लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री श्रीमती तबू यांच्या शुभहस्ते बारामतीतील नवीन कल्याण ज्वेलर्स शोरुमचा शानदार उदघाटन सोहळा पार पडला.
यासोबतच, कल्याण ज्वेलर्सचा लाईफस्टाईल ज्वेलरी ब्रँड, केनडियरच्या शोरूमचे देखील उदघाटन करण्यात आल्यामुळे शुभारंभाचा आनंद वृद्धिंगत झाला. केनडियर हा ब्रँड ट्रेंडी दागिने व आधुनिक डिझाईन्ससाठी नावाजला जातो. केनडियरचे दागिने कमी वजनाचे असतात, त्यामुळे आजची जेन झी पिढी, नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिला, इतकेच नव्हे तर स्टाईल-सॅव्ही पुरुषांना देखील ते खूप आपलेसे वाटतात. यांच्या किमती फक्त १०,००० रुपयांपासून सुरु होत असल्याने, कायम आठवणीत राहील अशी शानदार भेट म्हणून देण्यासाठी अगदी योग्य आहेत. ऑनलाईन खरेदी करता येईल असा ब्रँड म्हणून सुरुवात करून ते आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून उपलब्ध असणारा ब्रँड बनण्यापर्यंतचा प्रवास करताना, केनडियरने ऑनलाईन खरेदीतील सहजता आणि प्रत्यक्ष दुकानात जाऊन दागिने हाताळून पाहण्याचा अनुभव यांचा सुरेख संगम घडवून आणण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे.
आलिशान वातावरण आणि कल्याण ज्वेलर्सच्या एकापेक्षा एक सरस कलेक्शन्समधील अनेक विविध दागिने यांच्यासह हे नवीन शोरूम आपल्या पारखी ग्राहकांना खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करण्यासाठी सज्ज आहे.
कल्याण ज्वेलर्सचे ग्राहक आणि चाहते यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित होते, त्यांना उद्देशून अभिनेत्री श्रीमती तबू म्हणाल्या, “बारामतीमध्ये कल्याण ज्वेलर्सच्या पहिल्या शोरुमचे उदघाटन करताना मला खूप आनंद झाला. कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड विश्वास, पारदर्शकता आणि भारतीय वारशाविषयी सखोल आदरावर उभा आहे. हे नवीन शोरूम खरोखरच अप्रतिम आहे. कल्याण ज्वेलर्सचे सोने, हिऱ्यांचे दागिने आणि वधू-वधूंसाठीच्या खास कलेक्शन्सचे वैभव येथील स्थानिक ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, बारामतीकर या दागिने खरेदीच्या परिपूर्ण अनुभवाचे जंगी उत्साहाने स्वागत करतील.”
नवीन शोरूमच्या उदघाटन प्रसंगी कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री रमेश कल्याणरमण यांनी सांगितले, “बारामतीमध्ये आमचे पहिले शोरूम सुरु करून महाराष्ट्रामध्ये आमचे स्थान अधिक मजबूत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कल्याण ज्वेलर्स आणि केनडियर शोरूम्स ग्राहकांसाठी दागिन्यांच्या सर्वसमावेशक खरेदीचे ठिकाण ठरेल. सदाबहार कलाकुसर, आधुनिक डिझाईन्स आणि दागिने खरेदीचा अतुलनीय अनुभव हे सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्ता या आमच्या मूलभूत मूल्यांचे पालन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सर्वोत्तम दागिने, प्रमाणित कारीगरी आणि अतुलनीय सेवा मिळाव्यात यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
नवीन स्टोर सुरु होत झाल्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, कल्याण ज्वेलर्स ब्रँड ग्राहकांसाठी घेऊन येत आहे एक विशेष शुभारंभ ऑफर! १ लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्रत्येक खरेदीसोबत, खरेदी किमतीच्या ५०% पर्यंतच्या दागिन्यांवर ०% घडणावळ शुल्काचा लाभ घेता येईल. तसेच, ग्राहक जुने सोने बदलून घेताना ०% कपातीचा (डिडक्शन) लाभ घेऊ शकतात, सोबतच जुन्या सोन्याच्या बदल्यात त्वरित रोख रक्कमही मिळवू शकतात.
कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना हा ‘बीआयएस’ हॉलमार्क असतो. शुद्धतेच्या अनेक काटेकोर चाचण्या यशस्वीपणे पार केल्यानंतरच दागिना विक्रीसाठी उपलब्ध केला जातो. याव्यतिरिक्त, ग्राहकांना दागिन्यांसोबत ब्रँडचे सिग्नेचर ‘४-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र’ मिळते, जे सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल, उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरणांची हमी देते. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि उत्पादने कायम मिळावीत याप्रती ब्रँडची बांधिलकी यामधून अधोरेखित होते.
या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय ‘हाऊस ब्रँड्स’ देखील उपलब्ध असतील, ज्यात मुहूरत (लग्नाचे दागिने), मुद्रा (हाताने घडवलेले अँटिक दागिने), निमाह (मंदिर शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी हिरे), अंतरा (लग्नासाठीचे हिऱ्यांचे दागिने), हेरा (अगदी रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने), रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच केलेले लीला (रंगीत खडे आणि हिऱ्यांचे दागिने) या कलेक्शन्सचा समावेश असेल.
ब्रँड, त्यांची कलेक्शन्स आणि ऑफर्सविषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा – https://www.kalyanjewellers.net/
अटी व नियम लागू आहेत.*


