Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिर्लोस्कर न्यूमॅटिकच्या करपूर्व नफ्यात २४% वाढ; महसूल ₹३०० कोटींवर

किर्लोस्कर न्यूमॅटिकच्या करपूर्व नफ्यात २४% वाढ; महसूल ₹३०० कोटींवर

महसूल ₹३०० कोटींवर; करपूर्व नफा ₹४६ कोटी, EBITDA मार्जिन १७.५%
ऑर्डर बुक ₹१,८५३ कोटी; CRISIL कडून पतमानांकन AA पर्यंत उंचावले
– कॉम्प्रेशन व्यवसायाचा महसुलातील वाटा ९४%; तिमाहीत दोन नवीन उत्पादने बाजारात

पुणे, 21 जुलै : औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रातील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडने (KPCL) (BSE : 505283, NSE: KIRLPNU), आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27) मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली. *कंपनीचा करपूर्व नफा (PBT) २४ टक्क्यांनी वाढून ₹४६ कोटींवर पोहोचला, तर *ऑपरेशन्समधील महसूल १० टक्क्यांनी वाढून ₹३०० कोटी झाला.* मागील वर्षी याच तिमाहीत महसूल ₹२७२ कोटी होता.

कंपनीचा EBITDA २३ टक्क्यांनी वाढून ₹५४ कोटी झाला असून, EBITDA मार्जिन १५.७ टक्क्यांवरून १७.५ टक्क्यांपर्यंत सुधारले. करानंतरचा नफा (PAT) २१ टक्क्यांनी वाढून ₹३४ कोटी झाला, तर PAT मार्जिन १० टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर गेले.

एकत्रित (Consolidated) स्तरावर कंपनीचा महसूल ७-टक्क्यांनी वाढून ₹३०३ कोटी, तर करानंतरचा नफा ३२ टक्क्यांनी वाढून ₹३३ कोटी झाला. एकत्रित EBITDA मार्जिनही सुमारे ३०० बेसिस पॉइंट्सने वाढून १७.३-टक्के झाले.

1 जुलै 2026 रोजी कंपनीची ऑर्डर बुक ₹१८५३ कोटी होती. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ती ₹१८६३ कोटी होती. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ९४ टक्के वाटा कॉम्प्रेशन व्यवसायाचा आहे.

तिमाहीदरम्यान कंपनीने ‘तेझकॅटलिपोका’ (Tezcatlipoca) मालिकेतील A-800 सेंट्रिफ्यूगल कॉम्प्रेसर तसेच ‘टोनाली’ (Tonalli) हे सेंद्रिय अन्नकचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीसाठीचे कॉम्पॅक्ट समाधान बाजारात आणले. हे उत्पादन दररोज १०० ते २५० किलो अन्नकचरा निर्माण करणारे कारखाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांच्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

याशिवाय, क्रिसिलने (CRISIL) कंपनीच्या दीर्घकालीन पतमानांकनात *AA(-) वरून AA अशी सुधारणा केली* असून, ‘स्थिर’ (Stable) दृष्टीकोन कायम ठेवला आहे.

याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अमन किर्लोस्कर म्हणाले, “या तिमाहीतील महसूल वाढ तुलनेने मर्यादित असली, तरी बदलत्या व्यावसायिक वातावरणात कंपनीने स्थिर कामगिरी कायम ठेवली आहे. धोरणात्मक प्राधान्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार आणि कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा करण्यावर आमचा भर असून, यामुळे दीर्घकालीन शाश्वत वाढीस चालना मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments