Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रम* *जंतनाशक, वंध्यत्व...

महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रम* *जंतनाशक, वंध्यत्व निवारण शिबिरे व तांत्रिक मार्गदर्शनाचे वेळापत्रक जाहीर*

पुणे, दि. २१ (जिमाका, वृत्तसेवा): महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीला 2027 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत असल्याने हे वर्ष ‘महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरी व पशुपालकांसाठी जुलै 2026 ते एप्रिल 2027 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

त्याअंतर्गत जुलै 2026 ते एप्रिल 2027 या कालावधीत जंतनाशक शिबिरे, गायी-म्हशींसाठी वंध्यत्व निवारण शिबिरे तसेच प्रत्येक गावात जुलै ते सप्टेंबर 2026 दरम्यान जंतनाशक शिबिरे, जुलै 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत गायी व म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिरे, तसेच मार्च ते एप्रिल 2027 दरम्यान आधुनिक पशुसंवर्धन विषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. पशुपालकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच पशुवैद्यकीय सेवांसाठी 1962 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा 9063142299 या व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा उपयोग करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरवण्यात आलेल्या औषधांमधून हे उपक्रम राबवले जाणार असून, सर्व प्रादेशिक कार्यालयांना या उपक्रमांचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत. या उपक्रमांमुळे राज्यातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून पशुधनाची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.

*डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य:* महान समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून जंतनिर्मूलन, वंध्यत्व निवारण व तांत्रिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गावातील पशुधनापर्यंत पोहोचणार आहोत. ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे, जनावरांचे आरोग्य सुधारणे व दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments