Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस तर्फे रेट्रो फिल्म फेस्टिव्हल

सिनेपोलिस तर्फे रेट्रो फिल्म फेस्टिव्हल

पुणे,26 मार्च 2024 : भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस तर्फे रेट्रो फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.या फेस्टिव्हलमध्ये 90 च्या दशकातील भारतातील प्रसिध्द व लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.या फेस्टिव्हलचे आयोजन व्हीनस एंटरटेन्मेंट व अतुल सबरवाल यांच्या यिप्पी की ये मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 30 मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या रेट्रो फिल्म फेस्टिव्हल दरम्यान देशभरातील 25 सिनेपोलिस थिएटर्समध्ये दररोज दुपारी 1 ते सायंकाळी 7 दरम्यान दोन क्लासिक चित्रपट पाहता येणार आहेत.यामध्ये सिनेपोलिस अहमदाबाद,सिनेपोलिस पटना, सिनेपोलिस पीजेपी रांची, सिनेपोलिस सुरत आणि सिनेपोलिस वडोदरा, बंगळुरूमधील सिनेपोलिस शांतिनिकेतन, भोपाळमधील सिनेपोलिस डीबी,भुवनेश्वरमधील सिनेपोलिस एस्प्लेनेड,सिनेपोलिस डब्ल्यूटीपी जयपूर, सिनेपोलिस पीजेपी जमशेदपूर, कोलकाता येथील सिनेपोलिस अ‍ॅक्रो पोलिस,लखनऊमधील सिनेपोलिस अवध, मोहालीमधील सिनेपोलिस बेस्टेक, सिनेपोलिस ग्रँड मुझफ्फरपूर , नागपुरातील सिनेपोलिस व्हीआर, सिनेपोलिस दिल्ली एनसीआर- व्ही3एस ईस्ट सेंटर, सिनेपोलिस साकेत, नोएडामधील सिनेपोलिस स्मार्ट भारत, सिनेपोलिस एनएसपी, गुडगावमधील सिनेपोलिस एअरिया, मुंबईतील सिनेपोलिस – सिनेपोलिस – अंधेरी, ठाणे येथील विवियाना सिनेपोलिस, नवी मुंबईतील सीवूड्स आणि पुण्यातील सिनेपोलिस पुणे- सीझन्स, सिनेपोलिस वेस्टएन्ड यांचा समावेश आहे.या फेस्टिव्हल दरम्यान तीन सदाबहार व गाजलेल्या चित्रपटांमध्ये “मैं खिलाडी तू अनाडी “, “खिलाडी” आणि “बाजीगर यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments