Pune | July 2026: जगातील 5व्या क्रमांकाचा दागिने विक्रेता आणि जबाबदार ज्वेलरी ब्रँड असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे आर्थिक वर्ष 2026–27 साठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ₹200 कोटी CSR निधीअंतर्गत महाराष्ट्रातील 2,500 विद्यार्थ्यांना ₹1.9 कोटींच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. हा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम बुधवार, 22 जुलै 2026 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पुण्याच्या महापौर मा. सौ. मंजुषा नागपुरे, सहभागी शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे वरिष्ठ प्रतिनिधी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित राहतील.
राष्ट्रीय स्तरावर, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचा CSR कार्यक्रम 20 राज्यांतील 1,500 हून अधिक ठिकाणी राबविण्यात येणार असून आर्थिक वर्ष 2026–27 मध्ये 2 लाखांहून अधिक लोकांना त्याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, भूक निर्मूलन, महिला सक्षमीकरण, गृहनिर्माण आणि पर्यावरणीय शाश्वतता या क्षेत्रांवर केंद्रित उपक्रमांद्वारे समूहाने आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे.
शिक्षण हे समूहाच्या CSR उपक्रमांचे प्रमुख केंद्र राहिले आहे. गेल्या काही वर्षांत मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने ₹100 कोटींपेक्षा अधिक शिष्यवृत्ती सहाय्याद्वारे 1.15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मदत केली आहे. आर्थिक वर्ष 2026–27 अंतर्गत समूह देशभरातील 33,000 मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करणार आहे. समूहाने 17 राज्यांमध्ये 1,543 मायक्रो लर्निंग सेंटर्स स्थापन केली असून हे जाळे 2,500 केंद्रांपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. एकात्मिक शिक्षण आणि पोषण मॉडेलद्वारे 1 लाखांहून अधिक मुलांना सहाय्य देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. हे उपक्रम प्रथम् आणि थानल यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने राबविले जात आहेत.
राज्य स्तरावर, महाराष्ट्रातील मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे CSR उपक्रम शिष्यवृत्ती सहाय्यापलीकडे जाऊन शिक्षण आणि भूक निर्मूलन या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित करतात. समूह सध्या राज्यभरात 150 मायक्रो लर्निंग सेंटर्स (MLCs) चालवत असून तळागाळातील मुलांना शिक्षण व अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. भूक निर्मूलन उपक्रमांतर्गत मलाबार गोल्ड अँड डायमंड्स दररोज 11,000 हून अधिक भोजनांचे वितरण सुलभ करत असून वंचित समुदायांच्या पोषण आणि सर्वांगीण कल्याणात योगदान देत आहे.
या उपक्रमाबाबत भाष्य करताना मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले:
“शिक्षणामध्ये व्यक्ती, कुटुंबे आणि समाजाचे जीवन बदलण्याची तसेच दीर्घकालीन संधी निर्माण करण्याची ताकद आहे. आमच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे आर्थिक अडथळे कमी करून पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करणे आणि त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास सक्षम करणे हा आमचा उद्देश आहे. शिक्षण आणि समाजविकास क्षेत्रात सातत्यपूर्ण गुंतवणुकीद्वारे अर्थपूर्ण सामाजिक परिणाम घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
महाराष्ट्र शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम हा देशभरात संरचित CSR उपक्रमांद्वारे शिक्षणाची उपलब्धता अधिक मजबूत करण्याच्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे. ESG (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) तत्त्वांच्या मार्गदर्शनाखाली समूह मलाबार चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आपल्या निव्वळ व्यापार नफ्यापैकी 5% CSR उपक्रमांसाठी राखून ठेवतो. या माध्यमातून शिक्षण, आरोग्यसेवा, भूक निर्मूलन, महिला सक्षमीकरण, गृहनिर्माण आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या क्षेत्रांमध्ये विविध कार्यक्रम राबविले जातात.


