Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन*

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन*

*

पुणे, दि. २७: पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एप्रिल महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे १ व २ एप्रिल, मंचर येथे ८ व १० एप्रिल, जुन्नर येथे १५ व १६ एप्रिल, वडगाव मावळ येथे २२ व २३ एप्रिल तर लोणावळा येथे २९ व ३० एप्रिल या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments