Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत मालिकेतील वाहनांचा कर मुदतीत भरण्याचे आवाहन*

भारत मालिकेतील वाहनांचा कर मुदतीत भरण्याचे आवाहन*

पुणे, दि. २३ (जिमाका, वृत्तसेवा) : भारत (बीएच) मालिकेतील वाहनांचा मोटार वाहन कर नोंदणीनंतर दोन वर्षानंतरच्या मुदतीनंतर पुन:श्च भरणे आवश्यक असून वाहन मालकांनी दंड टाळण्यासाठी मुदतीत कर भरावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार भारत (बीएच) मालिकेअंतर्गत वाहन नोंदणीची व्यवस्था लागू केली आहे. या अधिसूचनेनुसार बीएच मालिकेतील वाहनांचा मोटार वाहन कर दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्वीकारला जातो. दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर वाहनधारकांनी नियोजित मुदतीत कर भरणे आवश्यक असून मुदत संपल्यानंतर सात दिवसांचा अवधी पूर्ण झाल्यानंतरही कर भरला गेला नसल्यास, त्यानंतर प्रतिदिन १०० रुपयांचा इतका दंड आकारण्याची तरतूद आहे, असेही कळविण्यात आले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments