नवी दिली, July 23, 2026: भारतातील अग्रगण्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या, पीएनबी मेटलाईफ़द्वारे आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये भक्कम अशा दावा निपाटाऱ्यांची नोंद करण्यात आली, वैयक्तिक स्तरावरील दाव्यांचा निपटाऱ्याचा स्तर हा 99.81% होता तर सामूहिक दावा निपटाऱ्यांचे प्रमाण हे 99.70% होते, यामुळे पुन्हा एकदा गरजेचा वेळेला ग्राहकांचा बाजूने उभे राहण्याची कंपनीची बांधिलकी दिसून आली.
आर्थिक वर्ष26 मध्ये, कंपनीने 6,188 वैयतिक दाव्यांचा निपटारा केला असून त्यांची किंमत ही सुमारे ₹526.62 कोटी इतकी आहे तसेच सामूहिक दाव्यांचा निपटाऱ्याची संख्या 6,868 असून एकूण रक्कम ही ₹502.69 कोटीची आहे. सेवेची गती ही फ़ार महत्वाची ठरली: 99.98% दावे हे आवश्यक त्या दस्तावेजांची पूर्तता झाल्यानंतर 30 दिवसांचा आत सोडविले गेले, 95% सात दिवसात आणि 35% फ़क्त एका दिवसाचा कालावधीत सोडविले गेले.
पीएनबी मेटलाईफ़ द्वारे आपल्या दाव्यांचा निपटाऱ्याला अधिक बळकट करण्यकारीता “ दावा सोडविण्याची हमी- 3 तासांची” असा उपक्रम देखील राबविला होता ज्यामुळे ₹56.67 कोटी रक्कम असलेले 1,681 दावे हे फ़क्त तीन तासांचा कालावधी मध्ये सोडविण्यात आले. आणि इतर दाव्यांची पूर्तता ही कमाल एका आठवड्याचा काळात करण्यात आली.
दावे सहज पद्धतीने करता यावे म्हणून ग्राहकांना डिजिटल आणि प्रत्यक्ष माध्यमांचा अगदी सहज वापर करता येतो जसे khUshi ॲप, कंपनीचे संकेत स्थळ तसेच व्हॉट्स ॲप किंवा आमचा भागीदार बॅंक शाखा आणि पीएनबी मेटलाईफ़चा शाखा या तर त्यांना मदत करण्याकरीता सदैव तत्पर असतात.
या महत्वाचा बाबीवर बोलताना, पीएनबी मेटलाईफ़चे एमडी आणि सीईओ, श्री. समीर बन्सल म्हणाले, “ पीएनबी मेटलाईफ़ येथे, प्रत्येक दाव्यावरती काम करण्याचा वायदा केला जातो. ग्राहक आमचा कडे येतात तेंव्हा बऱ्याचदा त्यांचा समोर एक आव्हानात्मक परिस्थितीअसते, त्यामुळे त्यांना फ़ार काळ थांबावे लागू नये किंवा काळजी वाटू नये असाच आमचा प्रयत्न असतो. आमची प्राथमिकता ही वेळ न घालवता, सहजपद्धतीने आणि सहानूभूती दाखवून त्यांना प्रत्येक पाऊलावर मदत करण्याची असते, ज्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाता येऊ शकेल. आर्थिक वर्ष26 मधील आमची 99.81% प्रगती ही आम्ही जलद सेवा, डिजिटल स्वीकृती आणि वैयक्तिक सहकार्याचा मदतीने ग्राहकांचा विश्वास जिंकण्याकरीता केलेल्या गुंतवणूकीचे प्रतिबिंबच आहे. ”
आर्थिकवर्ष26 मध्ये पीएनबी मेटलाईफ़ द्वारे वैयक्तिक दावा निपटाऱ्याचे प्रमाण 99.81% असल्याची नोंद करण्यात आली.
RELATED ARTICLES


