Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorized२०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी भारतीय पथकाचे प्रिन्सिपल पार्टनर म्हणून एसबीआय लाईफ...

२०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी भारतीय पथकाचे प्रिन्सिपल पार्टनर म्हणून एसबीआय लाईफ इन्शुरन्सची पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडियासोबत (पीसीआय) भागीदारी

ही भागीदारी भारतातील पॅरा-खेळाडूंच्या प्रवासाला प्रोत्साहन देते आणि व्यक्तींना आत्मविश्वासाने आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम करण्याच्या एसबीआय लाईफच्या वचनबद्धतेला पुन्हा अधोरेखित करते

भारत, २३ जुलै २०२६: एसबीआय लाईफ इन्शुरन्स या भारतातील अत्यंत विश्वासू खासगी जीवन विमा कंपनीने आज पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडियासोबतची (पीसीआय) आपली भागीदारी अधिक दृढ करत, २०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझन भारतीय पथकाचे ‘प्रिन्सिपल पार्टनर’ बनण्याची घोषणा केली. ग्लासगो येथे होणाऱ्या आगामी कॉमनवेल्थ पॅरा गेम्स २०२६ आणि आयची-नागोया, जपान येथे होणाऱ्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ साठी जाणाऱ्या भारतीय पॅरालिम्पिक पथकासाठी कंपनी ‘ऑफिशियल लाईफ इन्शुरन्स पार्टनर’ म्हणून काम करेल.

पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक खेळांदरम्यान भारतातील पॅरा-खेळाडूंसोबत आपल्या यशस्वी सहयोगाचा विस्तार करत एसबीआय लाईफ जिद्द, पूर्वतयारी आणि उत्कृष्टतेच्या अशा कथांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे, ज्या व्यक्तींना आत्मविश्वासाने आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतात.

या भागीदारीच्या माध्यमातून, एसबीआय लाईफचे उद्दिष्ट भारतातील उच्च दर्जाच्या पॅरा-खेळाडूंच्या प्रवासाची दखल घेणे आणि त्याला अधिक व्यापक बनवणे हे आहे; जे खेळाडू आपली निष्ठा आणि वचनबद्धतेद्वारे शक्यतांची पुनर्रचना करत आहेत. त्यांचा हा प्रवास एका सार्वत्रिक सत्यावर प्रकाश टाकतो, ते म्हणजे जेव्हा व्यक्तींकडे पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास, पाठबळ आणि पूर्वतयारी असते, तेव्हा कोणत्याही आकांक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात.

या भागीदारीबद्दल मत व्यक्त करत एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआर प्रमुख श्री. रविंद्र शर्मा म्हणाले, “एसबीआय लाईफमध्ये आमचा विश्वास आहे की, आत्मविश्वासच व्यक्तींना आयुष्यातील अनिश्चिततांसाठी तयार राहून स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम करतो. हा विश्वास आमच्या ‘अपने लिए, अपनों के लिए’ या ब्रँड तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे आणि यामुळेच आमचे पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडियासोबतचे सहकार्य इतके अर्थपूर्ण ठरते. भारतातील पॅरा-खेळाडू हे उद्देशाने पूर्वतयारी करणे, ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवणे आणि अढळ जिद्दीने कामगिरी करणे यांचे खरे प्रतीक आहेत. त्यांचा प्रवास हे दर्शवतो की, जेव्हा व्यक्तींना योग्य पाया भक्कमपणे पाठबळ देतो, तेव्हा त्या अडथळ्यांवर मात करून असाधारण टप्पे गाठू शकतात. २०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी भारतीय पथकाचे ‘प्रिन्सिपल पार्टनर’ म्हणून पीसीआयसोबत आपली भागीदारी दृढ करताना जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या असाधारण खेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्याचा आम्हाला अभिमान आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला पाठबळ देण्यापलीकडे ही भागीदारी आत्मविश्वास देण्याच्या आमच्या मोठ्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करते — जी व्यक्तींना आणि कुटुंबांना भविष्यासाठी आपसूक तयार राहण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे ते सर्वात महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील.”

भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष आणि पद्मभूषण, पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेळरत्‍न व अर्जुन पुरस्कार विजेते श्री. देवेंद्र झाझरिया म्हणाले, “आम्हाला २०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी एसबीआय लाईफ भारतीय संघाचे ‘प्रिन्सिपल पार्टनर’ म्हणून जोडले गेल्याने आमच्यातील सहयोग अधिक दृढ करताना मनापासून आनंद होत आहे. पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक गेम्सदरम्यान एसबीआय लाईफ आमच्यासोबत होते, जिथे भारताने २९ पदके जिंकून एक ऐतिहासिक टप्पा गाठला होता. पॅरालिम्पिक चळवळीवरील त्यांच्या या सततच्या विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. यांसारख्या कॉर्पोरेट भागीदाऱ्या अशा परिसंस्थेची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, जिथे पॅरा-खेळाडू क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतात. आमच्या खेळाडूंवरील एसबीआय लाईफचा अढळ विश्वास हा त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, सर्वोच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी आणि देशाचा अभिमान वाढवण्यासाठी सक्षम करण्याच्या सामायिक कटिबद्धतेला दर्शवतो. आम्ही कॉमनवेल्थ पॅरा गेम्स आणि आशियाई पॅरा गेम्सची तयारी करत असताना आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ही भागीदारी खेळाडूंना भारतासाठी अधिक मोठे यश मिळवून देण्यासाठी प्रेरित करेल.”

भारतातील पॅरा-खेळाडू कॉमनवेल्थ पॅरा गेम्स २०२६ आणि आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करत असताना एसबीआय लाईफ त्यांच्या या उत्कृष्टतेच्या प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभी आहे. ही भागीदारी एका सामायिक विश्वासाला बळ देते की, आत्मविश्वास, पूर्वतयारी आणि पाठबळाच्या जोरावर व्यक्ती सीमा ओलांडून असाधारण प्रवास घडवणे सुरू ठेवू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments