Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून फोल्डेबल्सची ८वी जनरेशन लाँच ~ गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, फोल्ड८ आणि...

सॅमसंगकडून फोल्डेबल्सची ८वी जनरेशन लाँच ~ गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, फोल्ड८ आणि फ्लिप८ भारतीय बाजारात सादर ~

पुणे, २३ जुलै २०२६: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आज आपली आतापर्यंतची सर्वात संपूर्ण गॅलेक्सी झेड लाइनअप लाँच केली, ज्यामध्ये व्यक्तींच्या काम करण्याच्या, निर्मिती करण्याच्या आणि कनेक्टेड राहण्याच्या विविध पद्धतींसाठी डिझाइन केलेल्या तीन डिवाईसेससह फोल्डेबल पोर्टफोलिओचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन लाइनअपमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ सोबत नवीन गॅलेक्सी झेड फोल्ड८ फॉर्म फॅक्टरचा समावेश आहे.

नवीन गॅलेक्सी झेड सिरीज मोठ्या स्क्रीन, कव्हर डिस्प्ले आणि फ्लेक्सिबल डिझाइनसाठी विशेषतः तयार केलेल्या अनुभवांद्वारे गॅलेक्सी एआयला दैनंदिन जीवनाच्या अधिक जवळ आणते. संपूर्ण लाइनअपमध्ये पारदर्शकता, गोपनीयता आणि वापरकर्त्‍याचे नियंत्रण कायम ठेवून वापरकर्त्‍यांना कमी टप्प्यांत टास्क्स पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी एआय अधिक वैयक्तिक, सक्रिय आणि कनेक्टेड आहे.

दिवसभरात व्यक्ती ज्या प्रकारे माहितीचा वापर करतात, त्यानुसार डिझाइन केलेला नवीन फोल्डेबल अनुभव सादर करतो. त्याचा १०:१६ कव्हर डिस्प्ले मेसेज पाठवणे, ब्राऊझिंग करणे आणि लहान व्हिडिओ पाहण्यासाठी नैसर्गिक स्मार्टफोन अनुभव देतो, तर ४:३ मुख्य डिस्प्ले वाचणे, गेमिंग, स्ट्रीमिंग आणि एकाच वेळी अनेक टास्क्स करण्यासाठी एका मोठ्या कॅनव्हासमध्ये बदलतो. फिरवल्यावर, या डिस्प्लेचे गुणोत्तर लेख आणि ई-बुक्स वाचण्यासाठी अधिक सोयीस्कर बनते.

केवळ २०१ ग्रॅम वजन असलेला गॅलेक्सी झेड फोल्ड८ हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका गॅलेक्सी झेड फोल्ड आहे. या डिवाईसमध्ये गॅलेक्सी प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन ८ एलिट जनरेशन ५ आणि ४८०० एमएएच बॅटरी आहे, ज्यामुळे उत्तम कार्यक्षमता आणि डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते.

सॅमसंगने नवीन फ्लेक्स टायटॅनियम तंत्रज्ञानासह डिस्प्लेच्या रचनेतही सुधारणा केली आहे, ज्यामुळे हा डिवाईस अधिक पातळ बनण्यास मदत झाली आहे आणि त्याची टिकाऊपणा वाढवून काळाच्या ओघात दिसणारी क्रिज कमी झाली आहे. हा डिस्प्ले ३००० नीट्सपर्यंतचा ब्राइटनेस, व्हिजन बूस्टर आणि बाहेरील प्रकाशात स्पष्ट दिसण्यासाठी कमी परावर्तन देणाऱ्या फिनिशिंगला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी, गॅलेक्सी झेड फोल्ड८ मध्ये वाईड आणि अल्ट्रा-वाईड दोन्ही दृष्टीकोनातून सातत्यपूर्ण इमेज क्वालिटीसाठी ड्युअल ५० मेगापिक्सल कॅमेरे आहेत. ड्युअल रेकॉर्डिंग एकाच वेळी प्रसंगाच्या दोन्ही बाजू टिपते, तर माय फॅनकॅम आपोआप निवडलेल्या विषयाचा मागोवा घेतो आणि सोशल मीडियासाठी तयार व्हिडिओंकरिता फुटेज पुन्हा फ्रेम करतो.

गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा: उत्कृष्ट उत्पादकतेचा फोल्डेबल गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा सॅमसंगचा अल्ट्रा अनुभव फोल्डेबल श्रेणीत घेऊन येतो. त्याचा विस्तृत ८-इंचाचा मुख्य डिस्प्ले एकाच वेळी अनेक टास्क्स करणे, कंटेंट निर्मिती आणि एआय-आधारित कामांसाठी एक मोठा वर्कस्पेस तयार करतो, तर अनफोल्ड केल्यावर फक्त ४.१ मिमी पातळ डिझाइन आहे आणि वजन फक्त २१५ ग्रॅम आहे.

या डिवाईसमध्ये २०० मेगापिक्सल मोडमध्ये एचडीआर सपोर्ट असलेला २०० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड कॅमेरा, सुधारित नायटोग्राफी आणि एपीव्ही कोडेक, तसेच सिने एलयूटी सपोर्टसह ८के रेकॉर्डिंगचा समावेश असलेले व्यावसायिक व्हिडिओ टूल्स आहेत, जे वापरकर्त्‍यांना एडिटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनदरम्यान अधिक स्थिरता देतात.

गॅलेक्सी प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन८ एलिट जनरेशन ५ द्वारे संचालित गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आव्हानात्मक कामांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसमध्ये विशाल ५००० एमएएच बॅटरी, नवीन ड्युअल-पाथ ४५ डब्लू फास्ट चार्जिंग आर्किटेक्चर आणि अधिक मल्टीटास्किंग व एआय अॅप्लिकेशन्स दरम्यान कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी विस्तारित ग्रॅफाइट कूलिंग सिस्टम यांचा समावेश आहे.

गॅलेक्सी झेड फ्लिप८: एआय सहजपणे उपलब्ध

गॅलेक्सी झेड फ्लिप८ सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि वजनाने हलका फ्लिप डिवाईस आहे, जो सुसंगत फॉर्म फॅक्टरमध्ये जलद संवाद आणि एआय-आधारित अनुभव इच्छिणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

नवीन स्वरूपातील फ्लेक्सविंडो एआय-नेटिव्ह इंटरफेस बनते, जे अॅप्स, माहिती आणि कृती थेट कव्हर स्क्रीनवर आणते. वापरकर्ते वैयक्तिकृत अपडेट्ससाठी नाऊ ब्रीफ वापरू शकतात, डिवाईस अनफोल्ड न करता जेमिनी इंटेलिजन्सचा वापर करू शकतात आणि आवाजाद्वारे किंवा बाजूच्या कीद्वारे जोडलेल्या कृती पूर्ण करू शकतात.

गॅलेक्सी झेड फ्लिप८ सॅमसंगच्या वैशिष्ट्यपूर्ण फ्लिप कॅमेरा अनुभवाचा विस्तार देखील करतो. या डिवाईसमधील ५० मेगापिक्सल कॅमेरा सुधारित पोर्ट्रेट्स आणि नैसर्गिक स्किन टोन्‍ससाठी प्रोव्हिज्युअल इंजिनद्वारे संचालित आहे. फ्लेक्स मोड एकापेक्षा जास्त कोनांतून हाताचा वापर न करता शूटिंग करण्यास सक्षम करतो, तर झूम रॉकरसह कॅमकॉर्डर ग्रिप, हॉरिझॉन्टल लॉकसह सुपर स्टेडी, फ्लिपशॉट आणि मिरर व्ह्यू यांसारखी वैशिष्ट्ये कंटेंट टिपणे आणि शेअर करणे अधिक सोपे करतात.

फोल्डेबल्ससाठी डिझाइन केलेले गॅलेक्सी एआय

नवीन गॅलेक्सी झेड सिरीज फोल्डेबल डिवाईसेससाठी ऑप्टिमाइज केलेले गॅलेक्सी एआय अनुभव सादर करते.

नाऊ ब्रीफ वैयक्तिकृत दैनंदिन माहिती आणि शिफारसी प्रदान करते. नाऊ नज संवादादरम्यान पुढील संबंधित टप्पे समोर आणून वापरकर्त्‍यांना माहितीकडून कृतीकडे जाण्यास मदत करते. जेमिनी इंटेलिजन्स ४० हून अधिक अॅप्स आणि सेवांमध्ये विनंत्यांना सपोर्ट करते, तर जेमिनी नोटबुक एआय-जनरेट केलेल्या सारांश आणि अहवालांसह नोट्स, फाइल्स, रेकॉर्डिंग्ज आणि इमेजेस एकाच वर्कस्पेसमध्ये एकत्र आणते.

गॅलेक्सी एआय दिवसभरात विविध डिवाईसेसमध्ये कनेक्टेड अनुभव तयार करण्यासाठी गॅलेक्सी वॉच अल्ट्रा, गॅलेक्सी वॉच९ आणि आगामी गॅलेक्सी इंटेलिजंट आयवेअरसोबत विनासायासपणे कार्य करते.

बिल्‍ट इन गोपनीयता

सॅमसंग ऑन-डिवाईस पर्सनलायझेशन आणि वापरकर्ता-नियंत्रित क्लाउड प्रोसेसिंग एकत्र आणून सॅमसंग नॉक्ससह ऑन-डिवाईस एआय सुरक्षा दृढ करणे सुरू ठेवते. पर्सनल डेटा इंजिन, नॉक्स एन्हान्सड एन्क्रिप्टेड प्रोटेक्शन, नॉक्स वॉल्ट आणि नवीन वन यूआय ९ एआय पारदर्शकता वैशिष्ट्ये एआय त्यांच्या माहितीचा कसा वापर करतो यावर वापरकर्त्‍यांना अधिक दृश्यमानता आणि नियंत्रण देतात. वन यूआय ९ एआय असिस्टंट अॅक्टिव्हिटी डॅशबोर्ड देखील सादर करतो, ज्यामुळे वापरकर्त्‍यांना एआयच्या कृती आणि सेटिंग्जचे एकाच ठिकाणी पुनरावलोकन करता येते, तसेच संभावित सुरक्षा धोके सक्रियपणे ओळखणाऱ्या सुधारित प्रायव्हसी अलर्ट्सचा लाभ घेता येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments