Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग इंडियाकडून ऑल-न्यू फोल्डेबल श्रेणी लाँच: गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, फोल्ड८ आणि...

सॅमसंग इंडियाकडून ऑल-न्यू फोल्डेबल श्रेणी लाँच: गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, फोल्ड८ आणि फ्लिप८; आकर्षक ऑफर्ससाठी आताच प्री-ऑर्डर करा

गॅलेक्सी झेड सिरीज सॅमसंगचा आजवरचा सर्वात परिष्कृत फोल्डेबल अनुभव घेऊन आली आहे, ज्यामध्ये विशेष उद्देशाने बनवलेले गॅलेक्सी एआय आणि हिंज डिझाइन, डिस्प्ले, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेमधील उल्लेखनीय इंजिनिअरिंगचे संयोजन आहे.
आताच प्री-ऑर्डर करा आणि १०,००० रुपयांची अपग्रेड ऑफर, किंवा ९,००० रुपयांपर्यंत बँक/युपीआय कॅशबॅक, किंवा शून्य टक्के डाऊन पेमेंट* सह ३० महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा आनंद घ्या.

सॅमसंग आँल न्यू फोल्डेबल श्रेणीचे आकर्षक आँफर्ससह प्री बुकिंग सुरू
पुणे, २४ जुलै २०२६ – सॅमसंग नवीन फोल्डेबल गॅलेक्सी झेड सिरीज आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. या श्रेणीमध्ये सर्वोत्तम कंटेंट वापरासाठी गॅलेक्सी झेड फोल्ड८, प्रगत उत्पादकता व निर्मितीसाठी गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, आणि सॅमसंगचे आजवरचे सर्वात स्लिम फ्लिप डिवाईस गॅलेक्सी झेड फ्लिप८ यांचा समावेश आहे. फोल्डेबल इनोव्हेशनच्या सात पिढ्यांवर आधारित ही सिरीज गॅलेक्सी एआयद्वारे संचालित आहे. ज्यामध्ये पारदर्शकता, गोपनीयता आणि वापरकर्त्याचे नियंत्रण कायम ठेवून कमी स्टेप्समध्ये टास्क्स पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी जेमिनी इंटेलिजन्सचा समावेश आहे.
“गेल्या सात पिढ्यांपासून आमच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सना मिळालेला प्रतिसाद सॅमसंगचे या श्रेणीतील नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध करतो. ज्याची सुरुवात आम्हीच केली होती. ग्राहक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि वैयक्तिकृत गॅलेक्सी एआय अनुभवांसाठी सॅमसंग फोल्डेबल्स निवडत आहेत, जे उत्पादकता आणि सर्जनशीलतेला सक्षम करतात. अत्याधुनिक हार्डवेअर इंजिनिअरिंग आणि टिकाऊ डिझाइनसह हे डिवाईसेस मेड इन इंडिया आहेत आणि त्यांना देशातील आमच्या आरअँडडी क्षमतांचे पाठबळ लाभले आहे, ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे नवनवीन शोध घेण्यास मदत होत आहे,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे प्रेसिडंट आणि सीईओ जेबी पार्क यांनी सांगितले. गॅलेक्सी फॉरएव्हर गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि झेड फोल्ड८ अल्ट्रा वर २४ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयसह प्रति महिना १,०८४ रुपये दराने उपलब्ध आहे.

गॅलेक्सी झेड फोल्ड८: सर्वोत्तम व्ह्यूइंग अनुभवावर लक्ष केंद्रित करणारा नवीन फोल्डेबल अनुभव
गॅलेक्सी झेड फोल्ड८ क्विक कव्हर-स्क्रीन परस्परसंवादापासून ते अनफोल्ड केल्यावर सर्वोत्तम व्ह्यूइंग, वाचन आणि गेमिंगमध्ये सहजतेने बदल करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. ४८०० एमएएच बॅटरीसह फक्त २०१ ग्रॅम वजन असलेला हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका गॅलेक्सी झेड फोल्ड आहे. नवीन फ्लेक्स टायटॅनियम डिस्प्ले स्ट्रक्चर क्रिज दृश्यमानता कमी करते आणि टिकाऊपणा सुधारते, तर मुख्य डिस्प्ले ३००० नीट्सपर्यंतच्या पीक ब्राईटनेसपर्यंत पोहोचतो. सिस्टममधील ड्युअल ५० मेगापिक्सल कॅमेरा, ड्युअल रेकॉर्डिंग आणि माय फॅनकॅम वैशिष्ट्ये विविध सीन्समधील कंटेंट कॅप्चर आणि एडिट करणे सोपे करतात.
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा: उत्पादकतेसाठी सर्वात प्रगत फोल्डेबल
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा सॅमसंगच्या सर्वोच्च दर्जाची कार्यक्षमता फोल्डेबल श्रेणीमध्ये घेऊन येतो, ज्यामध्ये मोठा ८-इंच मुख्य डिस्प्ले, प्रगत कॅमेरा सिस्टम आणि आव्हानात्मक वर्कफ्लोसाठी बनवलेले हार्डवेअर एकत्र केले आहे. हा डिवाईस फक्त ४.१ मिमी पातळ आहे आणि याचे वजन २१५ ग्रॅम आहे, ज्यामुळे हे सॅमसंगचे आजवरचे सर्वात स्लिम फोल्ड डिझाइन बनले आहे. एचडीआरसह २०० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि सुधारित नाईटोग्राफीसह नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स कोणत्याही प्रकाशात अधिक सुस्पष्टता देतात, तर नवीन एपीव्ही कोडेक आणि सिने एलयूटी टूल्ससह ८के व्हिडिओ रेकॉर्डिंग क्रिएटर्सना अधिक नियंत्रण देतात. स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ फॉर गॅलेक्सी प्लॅटफॉर्म आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच बॅटरीद्वारे संचालित हा डिवाईस दिवसभराचे काम आणि कंटेंट निर्मितीला पाठबळ देतो.
गॅलेक्सी झेड फ्लिप८: एआय-नेटिव्ह फ्लिप अनुभव
गॅलेक्सी झेड फ्लिप८ जलद परस्परसंवाद आणि वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जो एआय-नेटिव्ह फ्लेक्सविंडोभोवती निर्माण करण्‍यात आला आहे, जे कव्हर स्क्रीनवर थेट अॅप्स, माहिती आणि जेमिनी इंटेलिजन्स घेऊन येते. १८० ग्रॅम वजन आणि फक्त ६.१ मिमी पातळ असलेला हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आणि हलका फ्लिप डिवाईस आहे. सॅमसंगच्या प्रोव्हिज्युअल इंजिनद्वारे संचालित असलेला ५० मेगापिक्सल कॅमेरा तपशीलवार पोर्ट्रेट आणि नैसर्गिक स्किन टोन्स प्रदान करतो, तर फ्लेक्स मोड, होरायझन लॉकसह सुपर स्टेडी, फ्लिपशॉट आणि कव्हर स्क्रीन मिरर हँड्स-फ्री, तसेच कव्हर-स्क्रीन फोटोग्राफीला पाठबळ देतात.
गॅलेक्सी एआय सादर करत आहे अधिक वैयक्तिक आणि प्रोअॅक्टिव्ह अनुभव
नवीन गॅलेक्सी झेड सिरीज गॅलेक्सी एआयच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये नाऊ ब्रीफ आणि नाऊ नज वापरकर्त्याच्या दैनंदिन दिनचर्या आणि गरजांवर आधारित संबंधित माहिती आणि सुचवलेल्या पुढील स्टेप्स समोर आणतात. जेमिनी इंटेलिजन्स वापरकर्त्यांना कमी स्टेप्समध्ये विनंतीपासून पूर्ण कामापर्यंत पोहोचण्यास मदत करते, ज्यामध्ये आता ४९ अॅप्लिकेशन्स आणि सर्व्हिसेसमध्ये अॅप ऑटोमेशनला पाठबळ दिले आहे, आणि जेमिनीमधील नोटबुक नोट्स, इमेजेस व रेकॉर्डिंग्जची रचनाबद्ध सारांशांमध्ये मांडणी करते.
अनुभवामध्ये समाविष्ट केलेली सुरक्षा आणि गोपनीयता
नवीन गॅलेक्सी झेड सिरीज गॅलेक्सी एआयमधील विस्तारित गोपनीयता नियंत्रणांसह बहुस्तरीय सुरक्षितता देते. सॅमसंग नॉक्स प्रत्येक डिवाईसला चिप स्तरापासून सुरक्षित करते, ज्यामध्ये नॉक्स एन्हान्सड एन्क्रिप्टेड प्रोटेक्शन आणि नॉक्स वॉल्ट वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवतात. वन युआय ९ चे नवीन एआय असिस्टंट अॅक्टिव्हिटी डॅशबोर्ड वापरकर्त्यांना एआय क्रियांचा सेंट्रल व्ह्यू देते, तर एन्हान्सड प्रायव्हसी अलर्ट्स संभाव्य गोपनीयता जोखमींबद्दल माहिती देऊन अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण प्रदान करतात.
किंमत आणि उपलब्धता
मॉडेल
रॅम/स्टोरेज
रंग
किंमत
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा
१२/२५६ जीबी
ग्रॅफाइट, क्रीम, व्हॉयलेट शॅडो आणि ग्रीन शॅडो (ऑनलाइन एक्सक्लूसिव्ह)
१९९९९९ रूपये
१२/५१२ जीबी
२१९९९९ रूपये
१६/१ टीबी
२५९९९९ रूपये
गॅलेक्सी झेड फोल्ड८
१२/२५६ जीबी
ग्रॅफाइट, क्रीम, लव्हेंडर आणि पिस्ताचिओ (ऑनलाइन एक्सक्लूसिव्ह)

१७९९९९ रूपये
१२/५१२ जीबी
१९९९९९ रूपये
१६/१ टीबी
२३९९९९ रूपये
गॅलेक्सी झेड फ्लिप८
१२/२५६ जीबी
ग्रॅफाइट, क्रीम, पिंक आणि मिंट (ऑनलाइन एक्सक्लूसिव्ह)

१२४९९९ रूपये
१२/५१२ जीबी
१४४९९९ रूपये

प्री-ऑर्डर ऑफर्स
मॉडेल
अपग्रेड ऑफर्स
किंवा
बीसीबी/युपीआय ऑफर्स
किंवा
एनबीएफसी ईएमआय*
किंवा
बँक ईएमआय
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा
१० हजार रूपयांची अपग्रेड ऑफर
९ हजार रूपयांची बीसीबी/युपीआय ऑफर
शून्य डाउन-पेमेंटसह ३० महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय
शून्य डाउन-पेमेंटसह ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय
गॅलेक्सी झेड फोल्ड८
१० हजार रूपयांची अपग्रेड ऑफर
९ हजार रूपयांची बीसीबी/युपीआय ऑफर
शून्य डाउन-पेमेंटसह ३० महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय
शून्य डाउन-पेमेंटसह ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय
गॅलेक्सी झेड फ्लिप८
५ हजार रूपयांची अपग्रेड ऑफर
४ हजार रूपयांची बीसीबी/युपीआय ऑफर
शून्य डाउन-पेमेंटसह ३० महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय
शून्य डाउन-पेमेंटसह ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय

*३० महिने | शून्य हे निवडक एनबीएफसी भागीदारांसह उपलब्ध आहे: सॅमसंग फायनान्स+, टीव्हीएस क्रेडिट, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पीएफएल. उर्वरित प्रमुख एनबीएफसी भागीदारांसह २४ महिने | शून्यचा लाभ घेता येईल.
सॅमसंग केअर+*
सॅमसंग केअर+ नवीन गॅलेक्सी झेड सिरीज डिवाइसेससाठी बहुविध क्लेम्स आणि अधिकृत सर्व्हिस सपोर्टसह २ वर्षांची सर्वसमावेशक संरक्षण योजना प्रदान करते. गॅलेक्सी फॉरएव्हर प्लॅन नकळतपणे डिवाईस खाली पडल्यामुळे होणारे नुकसान, तसेच लिक्विड डॅमेजपासून सुरक्षेसह ५५ टक्‍क्‍यांपर्यंतच्या खात्रीशीर बायबॅक मूल्याचे पाठबळ देऊन डिवाइसेस अपग्रेड किंवा परत करण्याची स्थिरता प्रदान करतो. गॅलेक्सी फॉरएव्हर गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि झेड फोल्ड८ अल्ट्रा वर २४ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयसह प्रति महिना १,०८४ रुपये दराने उपलब्ध आहे.
*नियम व अटी लागू

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments