Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना साहस पुरस्कार जाहीर साहस दिनानिमित्त हर घर सावरकर...

गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना साहस पुरस्कार जाहीर साहस दिनानिमित्त हर घर सावरकर प्रतिष्ठान, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुणे नगर हिंदुसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १९१० मधील ऐतिहासिक उडीच्या स्मरणार्थ हर घर सावरकर प्रतिष्ठान, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुणे नगर हिंदुसभा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता डेक्कन जिमखाना येथील आयएमडीआर कॉलेजच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात साहस दिन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षीचा साहस पुरस्कार गोरक्षक सुधीर महादेव बहिरवाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती हर घर सावरकर चे प्रतिनिधी सूर्यकांत पाठक व रणजीत नातू ,अरुण अकोलकर यांनी दिली

या कार्यक्रमाला भारतीय वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर व आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण तज्ज्ञ विनायक पुरुषोत्तम डावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था, पुणे शहराचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि सात्यकी सावरकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे.

सुधीर महादेव बहिरवाडे यांनी २००४ मध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलामधून कार्यास सुरुवात केली. २०१६ मध्ये हिंदू महासभेत प्रवेश करून २०१७ मध्ये सोलापूर शहराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. २०१९ पासून ते अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गोरक्षण, हिंदुत्ववादी आंदोलने, सीएए समर्थनार्थ महारॅली, शहरांच्या नामांतरासाठी स्वाक्षरी मोहीम आणि वक्फ बोर्डविरोधातील मोर्चा अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या कार्यादरम्यान त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले असून अटक व तडीपारची कारवाईही झाली. असे असतानाही ते हिंदुत्व आणि गोरक्षणाच्या कार्यात सक्रिय आहेत.

सुर्यकांत पाठक – +91 94220 16895

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments