Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedखेडेकर हॉस्पिटल येथे मोफत दंत व नेत्र उपचार केंद्राचा शुभारंभ; नागरिकांना दर्जेदार...

खेडेकर हॉस्पिटल येथे मोफत दंत व नेत्र उपचार केंद्राचा शुभारंभ; नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार*

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने कै. द्रोपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी   येथे मोफत दंत व नेत्र तपासणी व उपचार केंद्राचे उद्घाटन आज उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते  पार पडले. या केंद्रामुळे पुणेकरांना त्यांच्या परिसरातच मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या नव्या केंद्रामध्ये एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी व उपचार सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि मोफत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ही सुविधा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान कै. बाबुराव शेवाळे दवाखान्यात लवकरच मोफत कॅन्सर केअर, डायग्नोस्टिक व सपोर्ट सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालयात अत्याधुनिक आयसीयू (ICU) बेडची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी उपमहापौरसुनीता परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सपना छाजेड, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर (IAS), आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नितीन धमाले, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संतोष मराठे यांच्यासह विविध मान्यवर, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी “निरोगी पुणे, सक्षम पुणे आणि सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments