Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री सद्गुरू पारवडेश्र्वर महाराज ट्रस्टतर्फे नाथ पुरस्कार जाहीर.

श्री सद्गुरू पारवडेश्र्वर महाराज ट्रस्टतर्फे नाथ पुरस्कार जाहीर.

पुणे -दिनांक — 27 जुलै 2026– गोवा येथील श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज ट्रस्टतर्फे आज सोमवारी नाथ पुरस्कार जाहीर करण्यात आले.
आमदार विश्वजित कदम यांना मच्छिन्द्रनाथ पुरस्कार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांना गोरक्षनाथ पुरस्कार, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. गणेश शिरसाट यांना कानिफनाथ पुरस्कार,पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांना जालिंदरनाथ पुरस्कार,शिलाई वर्ल्डचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक दादासाहेब गुजर यांना भर्तरीनाथ पुरस्कार,आग्रा – रायगड गरुड झेपचे मारुती गोळे यांना रेवणनाथ पुरस्कार,प्रसिद्ध शिल्पकार विशाल ताजणेकर यांना गहिनीनाथ पुरस्कार,इतिहास तज्ज्ञ डॉ नंदकिशोर मते यांना नागनाथ पुरस्कार व भैरवनाथ ग्रुपचे संचालक व उद्योजक विजय भगत यांना चर्पटीनाथ पुरस्कार आज सोमवारी जाहीर करण्यात आला. तसेंच प्रसिद्ध चित्रकार व निवेदक सौ. अंजली सावंत – देशपांडे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ही माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब अमराळे यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
येत्या बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 11-30 वाजता ऐशवर्या बँकेट हॉल, शिवसृष्टीमागे,सिंहगड कॉलेज रोड, वडगाव बुद्रुक येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मठाधिपती श्री सद्गुरू भाऊंमहाराज व युवराज सोहमराजे यांच्या हस्ते या सर्वाना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तंजावर गादीचे 13 वे वंशज श्रीमंत विजयराजे भोसले, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक प्रविण तरडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार शंकरराव मांडेकर,माजी उपमहापौर डॉ सतीश देसाई, राजर्षी शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष शांताराम धनकवडे, ऐशर्व्य बँकेट हॉलचे संचालक अमोल दळवी, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, व पुणे श्रमिक पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश शेळके या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments