Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रीडा निपुणता केंद्रात टेबल टेनिस खेळाडूंच्या प्रवेशासाठी गुरुवारी निवड चाचणी*

क्रीडा निपुणता केंद्रात टेबल टेनिस खेळाडूंच्या प्रवेशासाठी गुरुवारी निवड चाचणी*

पुणे, दि. २७: मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली असून राज्यातील टेबल टेनिस खेळाडूंच्या प्रवेशासाठी गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

टेबल टेनिस खेळांकरिता महाराष्ट्रातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गेल्या २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा, महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आदी कागदपत्र व आवश्यक साहित्यासह उपस्थित रहावे. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी निवास व भोजनाची व्यवस्था स्वत: करावयाची आहे. अधिक माहितीसाठी असद सय्यद- ९९२३०३२७८७, ईश्वर कदम- ९८५०९९९३०७ व अनिल बंदेल-९६०४६२९५६१यांच्याशी संपर्क साधावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीकरीता उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा पुणे विभागीय उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments