Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedएबीडी माएस्ट्रोचा बहु-शहरी बारटेंडिंग प्लॅटफॉर्म बार माएस्ट्रो पुण्यातील नवोदित कॉकटेल टॅलेंटला प्रकाशझोतात...

एबीडी माएस्ट्रोचा बहु-शहरी बारटेंडिंग प्लॅटफॉर्म बार माएस्ट्रो पुण्यातील नवोदित कॉकटेल टॅलेंटला प्रकाशझोतात आणत आहे

७ शहरांमधील ३५० पेक्षा जास्त नोंदींनंतर, १६० अव्वल बारटेंडर्स प्रादेशिक चव आणि कथा राष्ट्रीय मंचावर आणण्यासाठी स्पर्धा करत आहेत ~

 

पुणे, २७ जुलै २०२६: भारतातील नवोदित मिक्सोलॉजिस्टना एकत्र आणणाऱ्या अत्यंत यशस्वी पदार्पणानंतर बार माएस्ट्रो आता राऊंड २ मध्ये पोहोचला आहे. हा सात शहरांमधील बारटेंडिंग चॅलेंज अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेडचा (एबीडी) लक्झरी आणि सुपर-प्रीमियम स्पिरिट्स विभाग एबीडी माएस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड द्वारे तुल्लीहो बेव्हरेज अकॅडमीच्या सहयोगाने आयोजित केला जात आहे. सुरुवातीच्या फेरीने देशभरातून ३५० हून अधिक नोंदी आकर्षित केल्या, तर या स्पर्धेभोवतीच्या चर्चेला सोशल मीडियावर व्यापक प्रतिसाद मिळाला. इंस्टाग्रामवर ७.६ दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले, ज्याने भारतातील नवोदित कॉकटेल टॅलेंटबाबत असणारा उत्साह अधोरेखित केला आहे.

 

सुरुवातीच्या फेरीच्या केंद्रस्थानी सर्जनशीलतेवर आधारित एक आव्हान होते: वूडबर्न्स कंटेंपररी इंडियन व्हिस्कीचा वापर करून एक मूळ हायबॉल कॉकटेल तयार करणे. बारटेंडर्सनी स्वतःला आकार देणाऱ्या परंपरा आणि भूप्रदेशांकडे पाहिल्यामुळे भारताच्या विविध वारशाची सुंदर झलक समोर आली. देशभरातील निवडीनंतर, १६० मिक्सोलॉजिस्ट राऊंड २ मध्ये प्रवेश करत आहेत, ज्यामध्ये प्रत्येक शॉर्टलिस्ट केलेले कॉकटेल तांत्रिक प्राविण्य, कल्पकता आणि कथांकथनासाठी वेगळे ठरते.

 

पुणे हे नवीन युगाच्या मिक्सोलॉजीचे एक केंद्र म्हणून समोर आले आहे, ज्याने परंपरा आणि नवीन, भविष्याभिमुख दृष्टिकोन यांचा उत्तम मेळ साधणाऱ्या नोंदी सादर केल्या. शहरातील बारटेंडर्सनी परिचित घटकांचे उच्च दर्जाच्या आधुनिक पेयांमध्ये रुपांतर करून असाधारण कल्पकता दाखवली.

 

बार माएस्ट्रोला मिळालेला प्रतिसाद आणि राऊंड २ च्या शुभारंभाबद्दल मत व्यक्त करत एबीडी माएस्ट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर बिक्रम बासू म्हणाले, ”बार माएस्ट्रोला मिळालेला प्रतिसाद भारतातील बारटेंडिंग समुदायाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. सहभागींनी त्यांच्या स्वतःच्या स्थानिक संस्कृती आणि घटकांभोवती कथांची रचना केलेली पाहणे अत्यंत उत्साहवर्धक होते. ही सर्जनशील स्वायत्तता एका जिवंत, नवीन भारतीय कॉकटेल संस्कृतीला चालना देत आहे. बार माएस्ट्रोच्या माध्यमातून आम्ही कारागिरी आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देत राहू.”

 

राऊंड २ चे परीक्षण उद्योगातील आदरणीय तज्ज्ञांच्या पॅनेलद्वारे केले जाईल, ज्यामध्ये मिनोती माकीम, कार्पे दिएमच्या सीईओ आणि मयूर मारणे, कॉकटेल्स ऑफ टुमारो आणि कॉबलर अँड क्रूचे सह-संस्थापक यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ पुण्यातील २ बारटेंडर्सची निवड करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, जे राष्ट्रीय अंतिम फेरीत प्रवेश करतील. या स्पर्धेची सांगता १९ ऑगस्ट २०२६ रोजी बार टेकओव्हरने होईल, त्यानंतर २० ऑगस्ट २०२६ रोजी ग्रँड फिनाले होईल, जिथे भारताच्या पहिल्या बार माएस्ट्रो विजेत्याला गौरवि‍ण्यात येईल.

 

ग्राहक २७ जुलै २०२६ ते ३ ऑगस्ट २०२६ दरम्यान खालील आऊटलेट्सवर या कॉकटेल्सची जादू अनुभवू शकतात:

 

· बाणेर: एलिफंट अँड कंपनी, नान्नाज नेग्रोनी, कावलून टायगर्स.

 

· कोरेगाव पार्क: डेअली ऑल डे, असिलो.

 

· कल्याणी नगर: केरोस, फिलामेंट.

 

· शिवाजी नगर: ताओ फू जेडब्ल्यू, चिंगारी.

 

· मुंढवा: सोरिसॉ, निनकासा.

 

· इतर भाग: हिप्पी अॅट हार्ट, कोंढवा; सिब्बो, एफसी रोड; आसाई, बंड गार्डन रोड; अकासा, हिंजवडी; एट, वाकड; एलिमेंट, विमान नगर; मासू, संगमवाडी; विंडमिल, एनडीए चौक; सोक – नोव्होटेल, नगर रोड.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments