Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमनोब्रह्म फाउंडेशन संस्थापक डॉ. किरण चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण...

मनोब्रह्म फाउंडेशन संस्थापक डॉ. किरण चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण समितीवर निवड

 

 

पुणे, २८ जुलै: महाराष्ट्र शासनाच्या राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण समितीवर मनोब्रह्म फाऊंडेशनचे संस्थापक, संवाद रिहॅबिलिटेशन सेंटरचे संचालक तसेच मानसिक आरोग्य तज्ज्ञ व सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. किरण प्रकाश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असून मानसिक आजार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांच्या प्रतिनिधी म्हणून अशासकीय सदस्यपदी त्यांची निवड झाली आहे.

 

यासंदर्भात डॉ. किरण चव्हाण म्हणाले, “ही निवड माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर राज्यातील मानसिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख करण्याची मोठी जबाबदारी आहे. मानसिक आरोग्य सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पुनर्वसनाला अधिक बळकटी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

 

डॉ. किरण चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती, मानसिक आजारांचे पुनर्वसन, बेघर मनोरुग्णांचे पुनर्वसन, जनजागृती आणि समुदायाधारित मानसिक आरोग्य सेवांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

 

राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण हे महाराष्ट्रातील मानसिक आरोग्य सेवांचे नियोजन, गुणवत्ता नियंत्रण, देखरेख, मानसिक आरोग्य कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच मानसिक आजार असलेल्या व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असलेले सर्वोच्च वैधानिक प्राधिकरण आहे. या समितीवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि समाजप्रतिनिधींचा समावेश असतो.

 

डॉ. चव्हाण यांच्या या निवडीमुळे मानसिक आरोग्य क्षेत्रातील अनुभव व तळागाळातील कार्याचा राज्यस्तरीय धोरणनिर्मितीत उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments