Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहर्षी कर्वे कुटीसमोरील चिंतन अंगण म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातील विनम्रता व साधेपणाचं प्रतिकच

महर्षी कर्वे कुटीसमोरील चिंतन अंगण म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातील विनम्रता व साधेपणाचं प्रतिकच

 

 

पुणे, दि. २८ जुलै २०२६ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या आवारातील भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णांच्या ‘कुटी’ला यंदा १२६ वर्षे पूर्ण होत आहे. त्यासमोरील अंगणाच्या डिझाईनसाठी भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) आर्किटेक्चरल सल्लागार कक्षाची नेमणूक झाली असून आता तिथे सुंदर व कलात्मक स्वरूपाचे ‘चिंतन अंगण’ साकारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण संस्थेच्या १३०व्या वर्धापनदिनी नुकतेच संपन्न झाले.या वास्तूमध्ये अण्णांनी अखेरपर्यंत स्त्री शिक्षणाचे विचार व त्यावरील चिंतन सुरू ठेवले. त्यामुळे त्यापुढील अंगणास ‘चिंतन अंगण’ असे नाव देण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक वारसामध्ये या वास्तूचा समावेश आहे.

 

‘चिंतनअंगण’ प्रकल्पात कुटीशेजारील जुन्या झाडांचाचा वापर सावलीसाठी करण्यात आला आहे. जुन्या वारशाबरोबर सध्याच्या गरजांची पूर्ती करणारे साहित्य त्यामध्ये वापरण्यात आले असून कारंजे, बसण्यासाठी पायऱ्या आणि तुळशी वृंदावन व आशास्तंभ असे चिंतनानुकुल घटक यात समाविष्ट केले आहेत. महर्षी कर्वे व बाया कर्वे यांच्या इतिहासाशी पूरक शिल्पे व फलक इत्यादींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. या प्रकल्पातून संस्थेचा इतिहास, आत्मा आणि परिसराचे सत्व जपण्याचा हा प्रयत्न आहे.

 

बीएनसीएतील भूदृश्यकला विभाग प्रमुख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे म्हणाल्या की, चिंतन अंगणाची संकल्पना महर्षी कर्वे यांच्या कुटीसमोरच साकारण्यात आली आहे. या परिसरातच अण्णांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ ‘ज्ञान’, ‘बल’, ‘सेवा’ या तीन तत्त्वांवर रोवली. त्याचे द्योतक म्हणून तीन आशास्तंभ ह्या त्रिकोणी रचनेत चिंतन अंगणात साकारण्यात आले आहेत. स्त्री शिक्षणातील मूल्याधिष्ठता, विनम्रता, सेवाभाव, अभ्यासकता अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचे द्योतक असणाऱ्या विशिष्टता कुटी व त्यासमोरील अंगणातून साकार होतात. त्या दृष्टीने या भागाची रचना साकारण्यात आली असून चिंतनाचे तुषार येथे साकारण्यात आलेल्या कारंज्यांमधूनही साकार करण्यात आले आहेत. दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन या सांस्कृतिक खुणांचाही येथे समावेश करण्यात आला असून ती जांभा दगडात घडवली आहे.

 

बीएनसीएच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शुभदा कमलापूरकर म्हणाल्या की, यातील कुटी हे समृद्ध वारशाचे प्रतिक असून ‘चिंतन अंगण’ साठी तयार करण्यात आलेले वास्तूरचनाशास्त्रावर आधारित संरचना (डिझाईन) ही त्यातील आशयाला पूरक ठरली आहे. तसेच त्यातील बेसाल्ट आणि विषेशतः जांभा दगड याचा समर्पक वापर झाला आहे. कारण जांभा दगड हा कोकणातील मुरुड येथील असून तेथे अण्णांनी त्यांचे बालपण घालवले.

 

बीएनसीएचे माजी प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप म्हणाले की, यातील तयार केलेले डिझाईन ढोबळ स्वरूपाचे नसून महर्षी कर्वे यांच्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे असणारे अत्यंत साधे तयार करण्यात आले आहे.

 

बीएनसीए कक्षाच्या सल्लागारांमध्ये माजी प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, आणि प्रभारी प्राचार्य आणि बीएनसीए सल्लागार कक्षप्रमूख डॉ. शुभदा कमलापुरकर यांचा समावेश असून त्याचा आकृतीबंध (डिझाईन) संस्थेतील भूदृश्यकला विभाग प्रमूख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांनी तयार केला आहे. तर यात बसवलेल्या पुतळ्यांची संकल्पना स्वतः चित्रकार असणारे महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांची आहे. तर त्यामधील प्रतिकात्मक कारंजी उभारणी दीप अँड दीप संस्थेचे संदीप नाईक आणि ऋतूराज नाईक यांनी उभारली आहेत. चिंतन अंगणातील महषी कर्वे बाया कर्वे पहिल्या चार विद्यार्थिनी आणि अन्य बालिकांची शिल्पे नाशिकचे संदीप लोंढे तसेच पुण्यातील गणेश कळसकर या शिल्पकारांनी साकारली आहेत. हा प्रकल्प महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीच्या संकल्पनेतून साकारण्या

त आला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments