Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*हडपसर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न*

*हडपसर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न*

पुणे दि. २७- लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारंसहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन हडपसर येथील साधना विद्यालय येथे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी यांच्या हडपसर येथे आयोजित बैठकीत करण्यात आले.

बैठकीला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे, अतिरिक्त मतदार नोंदणी अधिकारी नागनाथ भोसले यांनी नेमण्यात आलेले भरारी पथक, मतदान केंद्र आणि सहाय्यकारी मतदान केंद्राबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.

निवडणूक शांततेत, निर्भयपणे आणि मुक्त वातावरणात पार पडावी आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार निवडणूक प्रक्रीया पार पडावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. त्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलीसांची परवानगी घ्यावी असेही आवाहन यावेळी करण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख आणि गणेश इंगळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments