Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedअपोलो हॉस्पिटल्स पुणे येथे पहिली रोबोटिक-सहाय्यित कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया यशस्वी अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथे पहिली रोबोटिक-सहाय्यित कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथे पहिली रोबोटिक-सहाय्यित कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया यशस्वी अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथे पहिली रोबोटिक-सहाय्यित कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

 

पुणे, जुलै २०२६: अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथे दा विंची Xi रोबोटिक सर्जिकल सिस्टिमच्या साहाय्याने पहिली रोबोटिक-सहाय्यित कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (CABG) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. बायपास शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हा अत्याधुनिक, कमी चिरा (Minimally Invasive) असलेला उपचार पर्याय उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण टप्पा असून, प्रगत हृदयविकार उपचार क्षेत्रातील रुग्णालयाच्या वाढत्या क्षमतेचे हे द्योतक आहे.

 

रोबोटिक-सहाय्यित बायपास शस्त्रक्रियेमध्ये पारंपरिक पद्धतीप्रमाणे छातीचे हाड (स्टर्नम) उघडण्याची आवश्यकता नसते. त्याऐवजी, केवळ काही लहान चिरांद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. रोबोटिक प्रणाली उच्च-गुणवत्तेचे त्रिमितीय (3D) दृश्य आणि अत्यंत अचूक उपकरण नियंत्रण प्रदान करते, ज्यामुळे निवडक रुग्णांमध्ये गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही कमी चिरांद्वारे सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे करता येतात.

 

दा विंची Xi रोबोटिक सर्जिकल सिस्टिममुळे शस्त्रक्रियेदरम्यान शरीराला होणारा आघात कमी होतो आणि विविध हृदयविकार शस्त्रक्रियांमध्ये अधिक चांगले वैद्यकीय परिणाम साध्य करण्यास मदत होते.

 

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल बोलताना डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अपोलो हॉस्पिटल्स पुणे, म्हणाल्या,

 

“ही उपलब्धी आमचे कार्डियाक सर्जन्स, भूलतज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट, नर्सिंग टीम आणि पुनर्वसन तज्ज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. पुण्यातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देताना सर्वोच्च दर्जाची क्लिनिकल गुणवत्ता कायम राखणे हेच आमचे ध्येय आहे.”

 

ही शस्त्रक्रिया डॉ. स्मृती हिंदारिया, वरिष्ठ सल्लागार – रोबोटिक व मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी, डॉ. बिकाश साहू, कार्डियाक अॅनेस्थेसियोलॉजिस्ट, तसेच अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथील कार्डियाक सायन्सेस आणि ICUच्या बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) टीमने यशस्वीरित्या पार पाडली.

 

या तंत्रज्ञानाद्वारे उपचार घेणारे पहिले रुग्ण ६७ वर्षीय पुरुष होते. त्यांना ट्रिपल व्हेसल कोरोनरी आर्टरी डिसीजचे निदान झाले होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांची प्रकृती वेगाने सुधारली आणि त्यांना चौथ्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात अशाच आणखी सहा रोबोटिक-सहाय्यित बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

 

तज्ज्ञांच्या मते, या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची निवड त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्यस्थिती, रक्तवाहिन्यांचा योग्य आकार आणि इतर गंभीर आजार नसणे या निकषांवर केली जाते. ही शस्त्रक्रिया साधारणतः चार ते पाच तासांमध्ये पूर्ण होते.

 

पारंपरिक ओपन-हार्ट शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला साधारण आठ ते दहा दिवस रुग्णालयात राहावे लागते. मात्र, रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला चौथ्या किंवा पाचव्या दिवशी डिस्चार्ज मिळू शकतो. लहान चिरे, कमी रक्तस्त्राव, संसर्गाचा अत्यल्प धोका आणि लवकर हालचाल सुरू होणे यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.

 

शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. स्मृती हिंदारिया म्हणाल्या,

 

“रोबोटिक-सहाय्यित बायपास शस्त्रक्रियेमुळे आम्हाला अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने करता येतात, तसेच रुग्णाच्या शरीरावर होणारा परिणामही कमी होतो. मात्र, ही पद्धत प्रत्येक रुग्णासाठी योग्य असेलच असे नाही. योग्य रुग्णाची निवड हा या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत मिळालेले परिणाम अत्यंत उत्साहवर्धक आहेत आणि भविष्यात अधिक पात्र रुग्णांना हा उपचार पर्याय उपलब्ध करून देण्याची आम्ही अपेक्षा बाळगतो.”

 

रोबोटिक कार्डियाक शस्त्रक्रियेच्या यशामागे अनुभवी बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) टीम, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि सर्वसमावेशक शस्त्रक्रियेनंतरची (Post-operative) देखभाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

 

याविषयी बोलताना डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अपोलो हॉस्पिटल्स पुणे, म्हणाल्या,

 

“अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथे या शस्त्रक्रियेसाठी समर्पित कार्डियाक भूलतज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट, परफ्युजनिस्ट, नर्सिंग टीम आणि पुनर्वसन तज्ज्ञ रुग्णाच्या संपूर्ण उपचार प्रवासात एकत्रितपणे कार्य करतात. प्रत्येक रुग्णाला सुरक्षित, प्रभावी आणि सर्वोत्तम उपचार अनुभव देण्यासाठी आमची संपूर्ण टीम कटिबद्ध आहे.”

 

४०० खाटांचे अपोलो हॉस्पिटल्स पुणे हे अत्याधुनिक क्वाटरनरी केअर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून, येथे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, स्ट्रक्चरल हार्ट प्रोसीजर्स आणि प्रगत कार्डियाक शस्त्रक्रिया यांसह सर्वसमावेशक हृदयरोग उपचार सेवा उपलब्ध आहेत. रोबोटिक-सहाय्यित बायपास शस्त्रक्रियेच्या प्रारंभामुळे पुणे आणि आसपासच्या भागातील रुग्णांसाठी अत्याधुनिक हृदय उपचाराचा आणखी एक प्र

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments