मुंबई , 29 जुलै 2026: भारतातील आघाडीच्या फंड हाऊसेसपैकी एक असलेल्या यूटीआय म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांसाठी एक अभिनव सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे गुंतवणूकदार व्हॉट्सॲप न सोडता, पेमेंटसह आपला गुंतवणुकीचा संपूर्ण प्रवास पूर्ण करू शकतील.
आधीच दररोज व्हॉट्सॲप वापरणाऱ्या लाखो भारतीयांसाठी आता यूटीआय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हे एखाद्याला मेसेज पाठवण्याइतकेच सोपे आणि सहज असेल (अधिक माहितीसाठी गुंतवणूकदार या लिंकवर क्लिक करू शकतात: https://bit.ly/UTIMFWhatsApp). गुंतवणूकदार एकाच व्हॉट्सॲप संभाषणादरम्यान यूपीआयद्वारे एकरकमी पेमेंट आणि व्यवहार करू शकतील. यासाठी कोणतेही वेगळे ॲप उघडण्याची किंवा ब्राउझरवर जाण्याची गरज भासणार नाही.
पेमेंट पार्टनर म्हणून कॅम्सपे, संवादाचे माध्यम म्हणून गपशप आणि एंगेजमेंट चॅनेल म्हणून मेटा व्हॉट्सॲप यांच्यातील सहकार्यामुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्राहकांना पेमेंटसाठी अन्य पेमेंट प्लॅटफॉर्मवर पाठवणाऱ्या (ज्यामुळे अनेकदा व्यवहार अर्धवट राहतात किंवा रद्द होतात) पारंपरिक पद्धतींच्या विरुद्ध, या सर्वसामावेशकतेमुळे गुंतवणूकदार संपूर्ण प्रक्रियेदरम्यान व्हॉट्सॲपवरच राहतात.
“आम्ही प्रत्येक गुंतवणूकदारासाठी गुंतवणूक प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. म्युच्युअल फंड उद्योगात व्हॉट्सॲपवर थेट इन-चॅट पेमेंटची सुविधा देणारी पहिलीच कंपनी बनून, गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या आणि रोज वापरल्या जाणाऱ्या माध्यमाद्वारे आम्ही गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी गुंतवणूक खऱ्या अर्थाने सहज आणि सुलभ करण्याच्या आमच्या प्रवासातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे यूटीआय एएमसीचे ग्रुप प्रेसिडेंट आणि सेल्स, प्रॉडक्ट तसेच डिजिटल विभागाचे प्रमुख श्री. पेशोतन दस्तूर यांनी सांगितले.
“व्हॉट्सॲप नेटिव्ह पेमेंट सोल्यूशन सक्षम करून कॅम्सपे बीएफएसआय (BFSI) संस्थांसमोरील एक वास्तविक जगातली समस्या सोडवत आहे, जिथे अपूर्ण प्रक्रिया आणि बाह्य पुनर्निर्देशनामुळे पेमेंटमध्ये व्यत्यय येतो. चॅटमध्येच एका-वेळचे आणि रिकरिंग पेमेंट स्वयंचलित व्हॉट्सॲप नोटिफिकेशन्ससह सक्षम करून, आम्ही व्हॉट्सॲपला केवळ संवादाचे माध्यम न ठेवता, त्याचे रूपांतरण डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये करण्यास मदत करत आहोत. आम्हाला अभिमान आहे की यूटीआयने हा पर्याय स्वीकारला आणि गुंतवणूकदारांसाठी ती सुरू केली,” असे कॅम्सपेचे सीईओ, श्री. वसंत जेयापॉल यांनी सांगितले.
हे एकत्रीकरण गपशपच्या संवादात्मक सहभाग पायाभूत सुविधा (कन्व्हर्सेशनल एंगेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर) आणि मेटाच्या व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मवर आधारित आहे; यामुळे यूटीआयला आपल्या गुंतवणूकदारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर आणि सुरक्षितपणे हा अनुभव पोहोचवणे शक्य झाले आहे.
“व्हॉट्सॲपवरील पेमेंट्ससह यूटीआय म्युच्युअल फंडसाठी एंड-टू-एंड ग्राहक अनुभव सक्षम करताना गपशपला अत्यंत आनंद होतो आहे. आर्थिक सेवांच्या क्षेत्रात ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी संवादात्मक प्रवास हेच भविष्यातील माध्यम असेल, असा आमचा विश्वास आहे. जेव्हा एखादी प्रतिष्ठित संस्था आपल्या ग्राहकांना त्यांच्या आवडत्या पर्यायामार्फत सेवा देण्याचा संकल्प करते, तेव्हा काय साध्य होऊ शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे,” असे मत गपशपचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर श्री. गौरव कच्छावा यांनी व्यक्त केले.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन आहे; योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.


