Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्याचे...

*धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ३० : महाराष्ट्र शासनाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नावात व नियमावलीत सुधारणा करून मंडळाचे ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी मंडळाचे सभासद व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

या मंडळाचे सभासद होण्यासाठी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून नोंदणी करावी. सभासदत्वासाठी नोंदणी व ओळखपत्र शुल्क ५०० रुपये तसेच वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये असे एकूण ८०० रुपये भरणे आवश्यक आहे.

 

मंडळामार्फत ६५ वर्षांवरील चालकांसाठी सन्मान निधी, कर्तव्यावर असताना जीवन व अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कौशल्यवृद्धी, कर्तव्यावर दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती अशा विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. सर्व पात्र प्रवासी वाहतूक चालकांनी मंडळाचे सभासदत्व घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.

0000

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments