Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्पीडो इंडियाचा 'अॅथलीट अॅडव्हान्समेंट प्रोग्राम' सुरू;  12 एलिट आणि पॅरा जलतरणपटूंना...

स्पीडो इंडियाचा ‘अॅथलीट अॅडव्हान्समेंट प्रोग्राम’ सुरू;  12 एलिट आणि पॅरा जलतरणपटूंना पाठबळ!

 

नवी दिल्ली | 30 जुलै 2026 : भारतातील स्पीडो इंटरनॅशनल लिमिटेडचा विशेष परवानाधारक (Exclusive Licensee) असलेल्या पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने देशातील जलतरण क्रीडेला चालना देण्यासाठी संरचित ‘अॅथलीट अॅडव्हान्समेंट प्रोग्राम’ सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत सध्या 12 एलिट आणि पॅरा जलतरणपटूंना पाठबळ देण्यात येत असून, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख जलतरण परिसंस्था उभारण्याच्या स्पीडो इंडियाच्या दृष्टिकोनाला या कार्यक्रमातून बळ मिळणार आहे.

 

या गटामध्ये ऑलिम्पियन साजन प्रकाश यांच्यासह सुहास मायलारी, हर्षिता जयराम, नीना वेंकटेश, श्रिष्टी उपाध्याय, शोअन गांगुली, ऋषभ दास, अदिती हेगडे, भाव्या सचदेवा आणि रुजुला.एस. या एलिट जलतरणपटूंचा समावेश आहे. तसेच निरंजन मुकुंदन आणि सुयश जाधव या पॅरा जलतरणपटूंनाही या उपक्रमात समान महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

 

या उपक्रमाबाबत पेज इंडस्ट्रीजचे मुख्य विपणन अधिकारी (Chief Marketing Officer) निहाल राजन म्हणाले, “भारतातील जलतरण क्रीडेला दीर्घकाळापासून अधिक व्यापक आणि सखोल ब्रँड पाठबळाची गरज होती आणि स्पीडो इंडियाचा हा कार्यक्रम त्याच दिशेने उचललेले पाऊल आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामागील उद्देश. आम्ही केवळ उच्च स्तरावरील खेळाडूंनाच पाठबळ देत नाही, तर प्रत्येक टप्प्यावर प्रतिभेला प्रोत्साहन देणारी, सर्वसमावेशकतेला चालना देणारी आणि प्रशिक्षकांना कामगिरीतील महत्त्वाचे घटक म्हणून सक्षम करणारी परिसंस्था उभारत आहोत. स्पीडोने नेहमीच जलतरणातील उत्कृष्टतेचे प्रतिनिधित्व केले आहे आणि या कार्यक्रमाद्वारे भारतीय जलतरणाचे शाश्वत भविष्य घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

 

हा कार्यक्रम बहुपदरी (Multi-tier) संरचनेवर आधारित असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यावर भर देतो.

 

अहमदाबाद येथे झालेल्या 79 व्या राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत स्पीडो इंडियाशी संलग्न खेळाडूंनी 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य अशा एकूण 22 पदकांची कमाई केली. याशिवाय त्यांनी 6 नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केले.

 

स्पीडोचा ‘कोच कनेक्ट प्रोग्राम’ देशभरातील 250 हून अधिक जलतरण तलावांमध्ये वर्षभरात 1,000 पेक्षा अधिक प्रशिक्षकांसोबत कार्यरत आहे. या उपक्रमाशी निशा मिलेट, किशोर शेट्टी (GMAAA मुंबई), हार्दिक पटेल (कर्णावती क्लब, अहमदाबाद), जोशुआ जोसेफ (MGMO मुंबई) आणि शरथ एम. गायकवाड (Zee अकादमी, बेंगळुरू) यांसारखी नामांकित व्यक्तिमत्त्वे जोडलेली आहेत.

 

सात दशकांच्या जागतिक वारशासह स्पीडो आजही जगभरातील जलतरणपटूंची पसंतीचा ब्रँड असल्याचे कंपनीने

म्हटले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments