ओणमच्या स्वागतासाठी ‘देवभूमी’ केरळमध्ये एकाच वेळी 20 पेक्षा जास्त विक्री केंद्रे सुरू, या वर्षात 500 केंद्रांचा टप्पा गाठण्याची तयारी
अत्यंत यशस्वी अॅडव्हेंचर आता लांबच्या प्रवासातील मजबूतीसाठी ‘येलो फाल्कन’ ट्यूबलेस क्रॉस-स्पोक व्हील्ससह सादर
2026 च्या येझदी श्रेणीमध्ये येझदीच्या बिनधास्त शैलीची झलक दाखवणारे तीन नवे आकर्षक रंग आणि डिझाइन सादर – यलो फाल्कन अॅडव्हेंचर, ग्रीन मम्बा रोडस्टर आणि ग्रे पॅन्थर स्क्रॅम्बलर
अल्फा2 आणि कतार इंजिन प्लॅटफॉर्मवर आधारित, येझदीच्या आधुनिक श्रेणीला देशभरातून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावर आधारित नवीन वाटचाल
भारताच्या उत्सव सिजनची सुरुवात करणाऱ्या ओणमच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय प्रस्तुतीसाठी केरळची निवड
देशभरात बुकिंग सुरू
आर्थिक वर्ष 28 पर्यंत देशभरात 700 विक्री केंद्रांपर्यंत विस्तार करण्याच्या कटिबद्धतेवर पुन्हा भर
कोची, [30 जुलै, 2026]: जावा येझदी मोटरसायकल्सने भारताच्या उत्सवाच्या वेळी येझदीची 2026 ची नवीन श्रेणी सादर केली. ‘अनटेम्ड ट्रिनिटी’ नाव दिलेल्या या तीन खास बनवलेल्या मोटरसायकल्स – यलो फाल्कन अॅडव्हेंचर, ग्रीन मम्बा रोडस्टर आणि ग्रे पॅन्थर स्क्रॅम्बलर – येझदीच्या वाटचालीला पुढे नेतात, जिथे प्रत्येक नवीन मॉडेल चालकांच्या गरजा पूर्ण करते. भारताच्या उत्सव सिजनची सुरुवात ओणमने होत असताना, या तिन्ही मोटरसायकल्सची राष्ट्रीय विक्री केरळमधून सुरू होत आहे.
या श्रेणीत सर्वात पुढे आहे यलो फाल्कन अॅडव्हेंचर, ज्यामध्ये क्रॉस-स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत, जे रायडर्सकडून सर्वात जास्त मागणी असलेल्या अपग्रेड्सपैकी एक असलेल्या पारंपारिक स्पोक व्हील्सची मजबूती आणि ट्यूबलेस टायर्सची सोय एकत्र आणतात. यामध्ये खास ग्रे आणि यलो रंगाचे कॉम्बिनेशन आणि ब्रँडची ओळख असलेले स्टिकर्स देखील दिले आहे. हा नवीन व्हील पर्याय संपूर्ण येझदी अॅडव्हेंचर श्रेणीमध्ये उपलब्ध असेल. 334-सीसी लिक्विड-कुल्ड अल्फा2 इंजिनद्वारे चालणारे हे मॉडेल 29.6 PS पॉवर आणि 29.9 Nm टॉर्क निर्माण करते आणि त्यात ट्रॅक्शन कंट्रोल तसेच ABS मोड्स (रोड, रेन आणि ऑफ-रोड) कायम आहेत.
ग्रीन मम्बा रोडस्टरला खास मॅट ग्रीन फिनिश देण्यात आला आहे, ज्याला क्विल्टेड अरेबिका-ब्राऊन सीट आणि ब्रँडची ओळख असलेले तांब्याच्या रंगाचे स्टिकर्सची जोड दिली आहे. यामध्ये रोडस्टरचे 334- cc लिक्विड-कुल्ड अल्फा2 इंजिन, सहा-स्पीड गिअरबॉक्स, असिस्ट-अँड-स्लिपर क्लच आणि मोड्यूल-आधारित सीटिंग कायम ठेवले आहे. ग्रे पॅन्थर स्क्रॅम्बलरला आकर्षक मेटॅलिक ग्रे फिनिशसह रिब्ड अरेबिका-ब्राऊन सीट आणि मॅचिंग टँक पॅड्स देण्यात आले असून, यात 334- cc लिक्विड-कुल्ड कतार इंजिन देण्यात आले आहे, जे चपळता आणि दैनंदिन वापर सोपा ठेवून 30 PS पॉवर, 30 Nm टॉर्क आणि 30 किमी/लिटर मायलेजचा असा उत्तम 30-30-30 समतोल साधते.
क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक बोमन रुस्तम इराणी म्हणाले: “येझदी हा ब्रँड नेहमीच आमच्याइतकाच त्याच्या रायडर्समुळे उभा झाला आहे. रायडर्सनी येझदी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली आहे, त्यांची पुनर्निर्मिती केली आहे आणि त्यांच्याभोवती समुदाय निर्माण केले आहेत. 2026 ची ही श्रेणी तीन खास बनावटीच्या मोटरसायकल्ससह याच भावनेला जिवंत करते.”
‘अनटेम्ड ट्रिनिटी’ हे येझदीच्या आधुनिक श्रेणीसाठी एका महत्त्वपूर्ण वर्षातील गतीवर आधारित आहे. नवीन पिढीतील अल्फा2 आणि कतार इंजिन, रायडर्सच्या गरजेनुसारची वैशिष्ट्ये, सुधारित अर्गोनॉमिक्स आणि आकर्षक डिझाइनवर आधारित येझदीच्या या श्रेणीने कंपनीला या विभागातील इतर ब्रँड्सपेक्षा जलद गतीने वाढण्यास मदत केली आहे.
ओणमच्या प्रसंगाने भारताच्या सणासुदीची सुरुवात होत असताना, केरळने 2026 च्या येझदी श्रेणीच्या राष्ट्रीय प्रस्तुतीसाठी व्यासपीठ तयार केले आहे. हे मध्यवर्ती क्षमतेच्या मिड-सीसी मोटरसायकल्ससाठी भारतातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे, जिथे येझदी ही बऱ्याच काळापासून संस्कृती, प्रवास परंपरा, वैयक्तिक कथा आणि अगदी चित्रपटांचाही एक भाग राहिली आहे.
क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले: “ओणमने भारतातील उत्सव सिजनची सुरुवात होत असल्याने, केरळ आणि तिथल्या रायडर्सबद्दलची आमची कटिबद्धता पुन्हा व्यक्त करण्यासाठी यापेक्षा योग्य जागा किंवा वेळ असू शकत नाही. एक रायडर म्हणून केरळ नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहिले आहे, आणि केरळच्या जुन्या वैभवापासून ते या नवीन प्रस्तुतीपर्यंत त्याने येझदीला आपलेसे केले आहे. आम्ही देशभरातील रायडर्सच्या या ब्रँडला अधिक जवळ आणत असताना, संपूर्ण भारतासाठी 2026 ची ही श्रेणी केरळमधून सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. मला खात्री आहे की, या रायडिंगच्या स्वर्गात आम्ही आमच्या विभागातील नंबर एक मोटरसायकल ब्रँड बनू. दुचाकी ब्रँड म्हणून, बहुदा केरळमध्ये राष्ट्रीय प्रस्तुती करणारे आम्ही पहिलेच आहोत.”
जावा येझदी मोटरसायकल्सने संपूर्ण केरळमध्ये 20 पेक्षा जास्त विक्री आणि सेवा केंद्रे सुरू करण्यासाठी विश्वासू आणि प्रस्थापित डीलर भागीदारांशी हातमिळवणी केली असून, ही एकाच राज्यातील कंपनीच्या सर्वात मोठ्या नेटवर्क विस्तारांपैकी एक आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यातील रायडर्ससाठी उपलब्धता मजबूत करेल आणि मालकीचा अनुभव अधिक समृद्ध करेल.
2026 च्या येझदी रंग श्रेणीसाठी संपूर्ण भारतात बुकिंग आता सुरू झाले आहे.
Yezdi Adventure
Ex Showroom (New Delhi)
Yellow Falcon (Tubeless)
₹ 2,32,969/-
Tornado Black, Gloss White, Nebula Blue (Tubeless)
₹ 2,29,969/-
Yellow Falcon
₹ 2,12,969/-
Yezdi Roadster
Ex Showroom (New Delhi)
Green Mamba
₹ 2,05,969/-
Yezdi Scrambler
Ex Showroom (New Delhi)
Grey Panther
₹ 2,05,969/-
ओनरशिप अश्युरन्स प्रोग्राम
जावा येझदी मोटरसायकल्सचा ओनरशिप अश्युरन्स प्रोग्राम पुढेही सुरू आहे, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
4 वर्षे / 50,000 किमी स्टँडर्ड वॉरंटी, जी 6 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते*
1 वर्षाचे रोडसाइड असिस्टन्स (RSA), जे 8 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते*
5 वर्षांचे AMC पर्याय*
कंपनीच्या वाढत्या वि
क्री आणि सेवा नेटवर्कद्वारे देशभरात ‘ओनरशिप सपोर्ट’


