*स्वातंत्र्यदिनी वडगाव शेरीत वर्टस फुटबॉल अकॅडमीचे दिमाखात उद्घाटन; युनिटी फुटबॉल कप २०२६ मध्ये विद्यांकुर स्कूल विजेता*
पुणे : भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वडगाव शेरी येथील विद्यांकुर स्कूलच्या प्रांगणात वर्टस फुटबॉल अकॅडमीचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या युनिटी फुटबॉल कप २०२६ स्पर्धेलाही तरुण खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माजी आमदार मोहन जोशी यांनी वर्टस फुटबॉल अकॅडमीचे कौतुक करताना, ही अकॅडमी तरुणाईला, विशेषतः जेन-झी पिढीला क्रीडा, शिस्त आणि सकारात्मक विचारांची मोठी प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त केला.
या संपूर्ण उपक्रमामध्ये वर्टस फुटबॉल अकॅडमीचे संस्थापक प्रशांत (लुकस) केदारी यांची भूमिका विशेष ठरली. सामाजिक, क्रीडा, कला आणि साहित्य क्षेत्राशी जोडलेले प्रशांत केदारी यांचे नेतृत्व आणि तरुणांसाठी काहीतरी भरीव करण्याची धडपड यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केली. युवा नेते अविनाश बागवे यांनीही त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत वर्टस अकॅडमीच्या ध्येयधोरणाला शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनप्रसंगी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, सुनील मलके, फादर ॲलेक्स, राहुल डबाळे, सत्यवान गायकवाड, महिला संघटक प्रतिमा केदारी,पीटर जॉर्ज, जॉन रूपवते, पुणे फूटबॉल असोसिएशन चे प्रदीप परदेशी, जॉय जोस, संजय गायकवाड,विमान नगर पोलीस स्टेशनचे पीआय अशोक शिरसाठ, रिफेन्स अल्फान्सो आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रशांत (लुकस) केदारी यांनी वर्टस अकॅडमीचे उद्दिष्ट स्पष्ट करताना पुण्यातील तरुण खेळाडूंना फुटबॉलच्या माध्यमातून शहर, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. अकॅडमीच्या हेड कोचपदी जोएल अलेक्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युनिटी फुटबॉल कपमध्ये विद्यांकुर स्कूलचा शानदार विजय
युनिटी फुटबॉल कप २०२६ मध्ये पुणे शहरातील संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात विद्यांकुर स्कूलने ब्लू टायगर अकॅडमीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत तरुण खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, संघभावना आणि क्रीडावृत्तीचे दर्शन घडविले.
स्पर्धेतील रेफरीची जबाबदारी गॅरी, फ्रेडी आणि जॉन केदारी यांनी सांभाळली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅड. अंतोन कदम, मार्कस पंडित, जॉर्ज रॉड्रिक्स, संजय गायकवाड, जॉन रूपवते, जॉय जोस,राजेंद्र चक्रनारायण, दिलीप घुटे, अरुण केदारी, मेरी पारगे, अतुल धीवर, मेरी पारगे,नरेश चव्हाण, राजकुमार सत्राळकर, जे डी आढाव,सलोमी तोरणे, राजेंद्र चक्रनारायण,संगीता केदारी, अभिजित कांबळे,नितीन भोसले, डेव्हिस देवदास, प्रवीण मॅथ्यू, सौदागर नवगिरे, स्टॅन्ली, नितीन भोसले आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तरुणांसाठी नवी संधी
वर्टस फुटबॉल अकॅडमी ही केवळ फुटबॉल प्रशिक्षण संस्था न राहता तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, नेतृत्वगुणांना आणि क्रीडा कौशल्याला व्यासपीठ देणारे केंद्र बनविण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. प्रशांत (लुकस) केदारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे पुण्यातील अनेक होतकरू खेळाडूंना भविष्यात मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
“तरुणाईला मैदानाकडे आणि सकारात्मक भविष्याकडे घेऊन जाण्याचा वर्टस अकॅडमीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, अशी भावना उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.


