बेंगळुरू, ३० मार्च २०२४: क्लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने आपला नवीन ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून क्रिकेटिंग लीजेण्ड – महेंद्र सिंग धोनी यांना ऑनबोर्ड केले आहे. हा सहयोग क्लीअरट्रिपसाठी ऐतिहासिक टप्पा आहे, जेथे कंपनीने महेंद्र सिंग धोनी यांच्यासोबत सहयोग केला आहे आणि कंपनी प्रवासामध्ये योग्य निवड करण्यासाठी सल्लामसलत करते. ‘क्लीअरचॉईस’ बकेटअंतर्गत ब्रँडचा प्रवाशांना सहजपणे निर्णय घेण्यास प्रेरित करण्याचा आणि विनासायास व त्रासमुक्त प्रवास अनुभव देण्याचा मनसुबा आहे.
कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाणारे महेंद्र सिंग धोनी यांच्यामध्ये पारदर्शकता, आशावाद आणि स्पष्टवादी ही मूल्ये दिसून येतात, जे क्लीअरट्रिपच्या तत्त्वांमध्ये सामावलेले आहेत. या सहयोगाच्या माध्यमातून क्लीअरट्रिप महेंद्र सिंग धोनी यांच्या विश्वभरातील अनेक पिढ्यांमध्ये व भौगोलिक क्षेत्रांमध्ये असलेल्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा आणि विविध युजरवर्गासाठी विश्वसनीय प्रवास सहयोगी म्हणून कंपनीचे स्थान दृढ करण्याचा प्रयत्न करते. हा सहयोग ग्राहकवर्गाला सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आणि बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्याच्या क्लीअरट्रिपच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे.
क्लीअरट्रिप ब्रॅण्ड अॅम्बेसेडर महेंद्र सिंग धोनी म्हणाले, ”माझ्या संपूर्ण करिअरदरम्यमान मी सतत विविध देशांमध्ये प्रवास केला आहे, ज्यामुळे मी अस्सल ग्लोबट्रॉटर राहिलो आहे आणि माझ्यामध्ये प्रवास करण्याची आवड निर्माण झाली. प्रवास माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मला क्लीअरट्रिपसोबत ऑनबोर्ड होण्याचा आनंद होत आहे. हा ब्रँड प्रवासाला धमाल, संस्मरणीय व अर्थपूर्ण करण्याप्रती कटिबद्ध आहे. माझ्या करिअरमध्ये मी दररोज अवघड निर्णय घेत आहे, पण क्लीअरट्रिपसह निर्णय घेणे सोपे व सरळ आहे. पारदर्शकतेप्रती त्यांची कटिबद्धता निवडींमधून दिसून येते आणि सर्वांना त्यांच्या स्वप्नवत प्रवासावर आत्मविश्वासाने जाण्यास प्रेरित करते.”
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत क्लीअरट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अय्यप्पन म्हणाले, ”आम्हाला क्लीअरट्रिप कुटुंबामध्ये महेंद्र सिंग धोनी यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. ते प्रख्यात खेळाडू आहेत, जे सर्व पिढ्यांमधील व्यक्तींना प्रेरित करतात. ते त्यांच्या मूल्यांसाठी ओळखले जातात आणि विश्वास व उत्तम नेतृत्व कौशल्ये निर्माण होण्यास प्रेरित करतात. त्यांच्यासोबत सहयोगाच्या माध्यमातून आम्ही व्यक्तींना प्रवासासंदर्भात योग्य निवड करण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना प्रवासाला सर्वांसाठी साध्य करता येण्याजोगी महत्त्वाकांक्षा बनवण्याची आशा करतो. महेंद्र सिंग धोनी यांना ऑनबोर्ड करण्यासह आमचा अधिकाधिक व्यक्तींना पुढाकार घेत आत्मविश्वासाने जगभरात प्रवासाचा आनंद घेण्यास प्रेरित करण्याचा मनसुबा आहे.”
महेंद्र सिंग धोनी क्लीअरट्रिपसोबत त्यांची पदार्पणीय इनिंग्ज सुरू करतील, जेथे लवकरच मनोरंजनपूर्ण जाहिरात प्रसारित होणार आहे.
क्लीअरट्रिप आणि महेंद्र सिंग धोनी यांचा सहयोगाने देशभरातील पर्यटकांना क्लीअरचॉईसवर विश्वास ठेवण्यास आणि सुस्पष्टता, आत्मविश्वास व संस्मरणीय अनुभवांनी भरलेल्या प्रवासाचा आनंद घेण्यास प्रेरित करण्याचा मनसुबा आहे. क्लीअरट्रिपवर ऑनबोर्ड व्हा, कर्णधाराच्या नेतृत्वाचे पालन करा आणि योग्य निवड करा.


