Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेईएम हॉस्पिटल पुणे तर्फे जागतिक ऑटिझम जागरूकता महिन्यानिमित्त जनजागृती रॅली संपन्न

केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे जागतिक ऑटिझम जागरूकता महिन्यानिमित्त जनजागृती रॅली संपन्न

पुणे, १ एप्रिल २०२४ : ऑटिझम स्पेक्ट्रम आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे,त्याबाबत असणारे गैरसमज दूर करणे आणि सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे सोमवार,1 एप्रिल 2024 रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता महिन्यानिमित्त आयोजित जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीमध्ये डॉक्टर, केईएम हॉस्पिटल पुण्यातील कर्मचारी सहभागी झाले होते. या रॅलीचा मार्ग गुडलक चौक येथून सुरु होऊन एफसी रोड, जेएम रोड असा होता.

दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस व संपूर्ण एप्रिल महिना ऑटिझम जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. मेंदू विकासासंबंधी विकाराच्या स्थितीबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश असून हा विकारअसलेल्या व्यक्तीचे वर्तन आणि सामाजिकरित्या संवाद साधण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ऑटिझम बाबत जागरूकता पसरवणे,याबरोबरच ऑटिझम असलेल्या व्यक्तींकरीता एक सहाय्यक वातावरण निर्माण करणे आणि ऑटिझम असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पाठिंबा देणे हा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments