*
पिंपरी :- सर्व समाजात काम करत अताना, नवनिर्वाचित पत्रकारांनी अधिक जोमाने समाजपयोगी काम करावे. तसेच पत्रकारांना कोणत्याही प्रकारे मदत लागल्यास हक्काने यावे असे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी यावेळी सांगितले.
कै.भा.वि.कांबळे पत्रकार कक्ष, पिंपरी चिंचवड महापालिका मध्ये ओम साई फाउंडेशन तर्फे पिंपरी चिंचवड पत्रकार संघातील नवनिर्वाचित सदस्यांनचा सत्कार करण्यात आला. यावेळी मारूती भापकर मा. नगरसदस्य, ज्येष्ठ पत्रकार- नाना कांबळे, बापूसाहेब गोरे, संजय मराठे-अध्यक्ष ओम साई फाउंडेशन, उमेश सनस, पराग डिंगणकर, तोफिक सय्यद, शांताराम मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष- प्रविण शिर्के, कार्याध्यक्ष-प्रविण (बाबु) कांबळे, महिला अध्यक्ष- माधुरी कोराड, महिला उपाध्यक्षा-श्रध्दा प्रभुणे, उपाध्यक्ष- बद्रिनारायन घुगे, खजिनदार-दिनेश दुधाळे, कार्यकारीणी सदस्य-सारीका भिंगे, पंकज लालझरे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती-अनिल भालेराव, सल्लागार-बाळासाहेब ढसाळ.
पिंपरी चिंचवड डिजीटल पत्रकार संघाचे अध्यक्ष-राम बनसोडे, कार्याध्यक्ष-देवा भालके, उपाध्यक्ष- गौरव साळुंखे, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस-भिमराव बरकडे, सहसरचिटणीस-निलेश सायकर, खजिनदार- शाम सोनवणे, सहखजिनदार- शेहनाज कुरणे, कार्यकारीणी सदस्य-शैलेष जाधव, सचिन सोनवणे यांचा सत्कार शाल व छत्रपतींची प्रतीमा देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला अध्यक्षा माधुरी कोराड यांनी केले तर आभार अध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी मानले.


