Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे ऑगस्ट २०२६ अखेर अधिकारी, कर्मचारी असे...

पिंपरी -चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे ऑगस्ट २०२६ अखेर अधिकारी, कर्मचारी असे एकुण ३८ जण सेवानिवृत्त… महापालिकेकडून सन्मानपत्र देऊन सत्कार….

पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२६ :– महापालिकेच्या सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा आणि त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आठवण महापालिकेस सदैव राहील तसेच त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जावो असे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले तसेच सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून ऑगस्ट २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या २८ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १० अशा एकूण ३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार व निरोप समारंभ आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर येथे उत्साहात पार पडला, त्यावेळी शुभेच्छा देताना उप आयुक्त संदीप खोत बोलत होते.

यावेळी सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेसाठी उप आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे, महादेव बोत्रे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी आणि सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता सुरेखा कुलकर्णी, लघुलेखक विजयश्री देसाई, मुख्याध्यापिका सविता पवार, प्रमिला जाधव, प्रतिभा वलटे, सुजाता कर्जतकर, विद्या कातोरे, सुनिता गिते, कार्यालय अधिक्षक संजय गरगरे, लेखापाल सुचेता कुलकर्णी, रविंद्र बोऱ्हाडे, मुख्य आरोग्य निरीक्षक सुनील वाटाडे, सिस्टर इनचार्ज निशिगंधा अमोलिक, पुष्पा लाड, क्रीडा शिक्षक शिवाजी मुटकुळे, उपशिक्षिका सुनंदा बोरसे, संजीवनी चौधरी, रखवालदार सुभाष जाधव, आया प्रतिभा निघुट, लिफ्टमन संजय दर्शले, मजूर रविंद्र बोधे, सुशील गडेकर, शिवाजी जगताप, किशोर बारला, उत्तम कलाल, राजू साठे, आणि संजय सावंत यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ.रविंद्र मंडपे, उप अभियंता सत्वशील शितोळे, दूरध्वनी चालक राजश्री गायकवाड, प्लंबर रोहिदास जमदाडे, मजूर संजू साळवे, स्प्रे-कुली दत्तात्रय ढगे, सफाई कामगार सुभाष गायकवाड, रामदास तळपे, पांडुरंग झांजरे, सिताराम लांडे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार मुख्य लिपिक माया वाकडे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments