Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालकांचे दत्तक विधान बळकट करण्यासाठी पश्चिम विभागीय कार्यशाळेचे आयोजन*

बालकांचे दत्तक विधान बळकट करण्यासाठी पश्चिम विभागीय कार्यशाळेचे आयोजन*

 

 

पुणे, दि. 2 : विशेष गरजा असलेल्या बालकांचे दत्तक विधान बळकट करण्यासाठी केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण, नवी दिल्ली (CARA) तर्फे पुण्यात पश्चिम विभागीय कार्यशाळेचे गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास आयुक्तालयाकडून कळविण्यात आली आहे.

ही कार्यशाळा केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण, नवी दिल्ली (CARA) २०२५ च्या दत्तक जनजागृती मोहिमेचा एक भाग आहे. “विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) बालकांचे संस्थाबाह्य पुनर्वसन” ह्या संकल्पनेवर हि कार्यशाळा आधारित आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंबात वाढण्याची संधी मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.

कार्यशाळा होत असलेल्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. या मोठ्या क्षेत्रामुळे पुण्यातील या कार्यशाळेत 74 पेक्षा जास्त जिल्ह्यांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बालकांना संस्थेत जास्त काळ ठेवण्याऐवजी कुटुंबावर आधारित संगोपनाला प्रोत्साहन देणे आणि दिव्यांग बालकांचे पुनर्वसन करणे हा उद्देश आहे.

या कार्यशाळेत पश्चिम विभागातील राज्य दत्तक स्रोत संस्था (SARA), विशेष दत्तक संस्था (SAA), बालगृहे (CCI), जिल्हा बाल संरक्षण कक्ष (DCPU), मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO), व बाल संरक्षण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

विशेष गरजा असलेल्या बालकांच्या दत्तकाबाबत प्रत्येक राज्याची सद्यस्थिती, अडचणी आणि चांगले अनुभव उपस्थित राज्यांच्या प्रतिनिधी यांच्या कडून त्यांच्या जिल्ह्यातील यशस्वी कथा आणि पुराव्यांवर आधारित उपाययोजना, ज्यांची विविध राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये पुनरावृत्ती करता येईल. या कार्यशाळेत वैद्यकीय, कायदेशीर, आर्थिक आणि तक्रार निवारणासंबंधी येणाऱ्या अडचणी, वेगवेगळ्या विभागांनी एकत्र येऊन चांगला समन्वय ठेवणे आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेतून मिळणाऱ्या निष्कर्षांमुळे दत्तक व्यवस्था अधिक सर्वसमावेशक, संवेदनशील आणि बालक-केंद्रित होण्यास मदत होईल. तसेच कुटुंबाची गरज असलेल्या प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि प्रेमळ कुटुंबात वाढण्याची, शिकण्याची आणि घडण्याची संधी मिळेल, यासाठी सर्वांचा एकत्रित प्रयत्न अधिक दृढ होईल.

 

00

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments