पुणे, दि. ३ : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आंध, पुणे येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुलुंड, मुंबई यांच्या मान्यतेने स्टेनोग्राफी मराठी (लघुलेखन मराठी) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या व्यवसायासाठी एकूण २४ प्रवेश क्षमता असून, त्यापैकी १६ जागांवर यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार प्रवेश झाले आहेत. उर्वरित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://msbsvet.edu.in� या संकेतस्थळावरून दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत संस्थेत जमा करणे आवश्यक आहे.
दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून, प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही त्याच दिवशी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आंध, पुणे येथील मुख्य इमारतीतील कौशल्य हॉल येथे करण्यात येणार आहे. प्रवेशित उमेदवारांचे नियमित प्रशिक्षण दि. १६ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
उर्वरित जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक श्री. स. मा. धुमाळ यांनी केले आहे.


