Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedडिजे बाबतचे मत सर्वसमावेशक - संदीप खर्डेकर

डिजे बाबतचे मत सर्वसमावेशक – संदीप खर्डेकर

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस… महाराष्ट्राचे लाडके “देवाभाऊ”…

मी NDTV च्या मुलाखतीत जे मत मांडले त्याच धर्तीवर सर्वसमावेशक भूमिका त्यांनी मांडली याबद्दल अभिमान वाटतो….

मी काल श्री. बापट यांच्या बद्दल जे मत व्यक्त केले तेच आज दै.सकाळ मधील आलोक च्या व्यंगचित्रात ध्वनीत झाले…

👇

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेला अति हुशार, अति शिकलेला, सर्व ज्ञानी विद्यानंद बापट…

आता मात्र गरळ ओकतोय…

त्यांची डीजे बाबत ची भूमिका सर्वांनाच पटली….मी ही त्याला पाठिंबा दिला…त्यांना ज्या पद्धतीने सभागृहातून हुसकावले ते ही चुकीचेच होते ( मुळात गणेश मंडळाच्या बैठकीला ते का गेले यातच सर्व आले, ते स्वतंत्रपणे मत मांडू शकत होते, पण ते बुद्धिमान असल्यामुळे कुठे बोलल्यावर आपण प्रसिद्ध होऊ हे ते नक्कीच जाणून असणार, म्हणून त्यांच्या हेतू विषयीच शंका उत्पन्न होते ) अर्थात त्यामुळे त्यांनी मांडलेला मुद्दा गैरलागू ठरत नाही…..त्यांना तेथून हुसकावले नसते तर ते प्रसिद्धीच्या झोतात आलेच नसते… मंडळांचे अतिउत्साही कार्यकर्ते सर्वात पहिले इथेच चुकले आणि बापट नावाचे भूत उभे राहिले…

त्यांच्या डीजे बाबतच्या भूमिकेचे समर्थन करताना माझ्या पक्षात सर्वात आधी मी त्यावर भाष्य केले….

पण नंतर मात्र “हवा गेली भाऊ” च्या डोक्यात…

“प्रसिद्धी चं भूत” एकदा का मानगूटीवर बसले की भले भले उडायला लागतात… आणि मग जमिनीवर यायला वेळ लागत नाही…

तेच होतंय…

डी जे, कर्णकर्कश आवाज हा बापटांचा मुद्दा सर्वमान्य…. त्यांना झालेली मारहाण ही असमर्थनिय… निषेधार्य…

पण आताची त्यांची मुक्ताफळं ही ना केवळ भावना दुखावणारी तर आता ते हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना instigate करत आहेत… संस्कृत मधील श्लोक आणि अस्खलित मराठी बोलणारे हे सदगृहस्थ मर्यादा ओलांडत आहेत… त्यांना आवर घालण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे…..आता हे सदगृहस्थ एबीपी माझा च्या सरिता कौशिक यांना दिलेल्या मुलाखतीत मनपा सभागृहात गणेश मंडळाच्या बैठकी आधी बाप्पा ची आरती केली त्याला आक्षेप घेतात, तेथे कार्यकर्ते भगवी टोपी घालून गंध लावून आले त्याला आक्षेप घेतात, गणपती बाप्पा मोरया ला आक्षेप घेतात,लष्करे तैय्यबा प्रमाणे लष्करे उत्सव म्हणतात…. तोल सुटलाय बाबाचा….

आता पुणे पोलिसांनी त्यांना डीजे पुरते किंवा सर्वधर्मीय सणातील गैरप्रकार दूर करण्यापूरते वक्तव्य करण्याबाबत समजपत्र द्यावे…. त्यांच्या अति आणि अनावश्यक बोलण्यामुळे ते लवकरच ज्या वेगाने वर गेले त्याच्या दुप्पट वेगाने लोक निंदेस पात्र ठरतील याबाबत माझ्या मनात शंका नाही !!

 

गणराया… सुबुद्धी दे रे ह्यांना बाप्पा…. 🙏

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments