Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedथेरगाव येथे लोकसभा निवडणूकीसाठी नेमलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न* ...

थेरगाव येथे लोकसभा निवडणूकीसाठी नेमलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न* *निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी- निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला*

 

 

पुणे, दि. २ :- आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला यांनी केले.

 

मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने थेरगाव येथील स्व. शंकर गावडे कामगार भवन येथे सेक्टर अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री.सिंगला बोलत होते. प्रशिक्षण सत्राला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार अमोल कदम, समन्वय अधिकारी अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता प्रकाश कतोरे आदी उपस्थित होते.

 

यावेळी श्री. सिंगला यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वृद्ध, अपंग, महिला यांचे मतदान त्वरेने होईल याची दक्षता संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश दिले.

 

श्री. जोशी यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातंर्गत नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावरील संपुर्ण तयारी, मतदानापुर्वीची तयारी, मतदानावेळीची तयारी आणि मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरची तयारी इत्यादी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.

 

श्री. कदम यांनी मतदान साहित्य ताब्यात घेणे, जमा करणे याबाबतची माहिती देवून मतदान केंद्राची स्थिती आणि त्याठिकाणी करावयाच्या उपाययोजना याबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले.

 

श्री. गायकवाड आणि श्री. कतोरे यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण दिले. यावेळी मतदान यंत्र सिलींग आणि कमिशनिंग याबाबतची माहिती देखील प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.

 

प्रशिक्षणासाठी ४८ सेक्टर अधिकारी, ४८ सहाय्यक आणि ५ राखीव सेक्टर अधिकारी उपस्थित होते. यातील ५ सेक्टर अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय मतदान यंत्राच्या हाताळणीचेदेखील प्रशिक्षण त्यांनी घेतले. यानंतर प्रशिक्षणार्थींकडून मतदान यंत्र हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक देखील करून घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी ४० मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments