७ सप्टेंबर २०२६: अपॅरेल निर्माता आणि रिटेलर कॅन्टाबिल रिटेल इंडिया लिमिटेडने त्यांच्या पुण्यातील १६ व्या नव्या दालनाचा शुभारंभ नुकताच केला. पिंपरी चिंचवड येथे एमआयडीसी जिंजर हाँटेलजवळ अंदाजे १०३५ चौ.फूट क्षेत्रफळात हे दालन साकार झाले आहे. पुरुषांसाठी कॅज्युअल, पार्टी आणि फॉर्मल वेअरची संपूर्ण रेंज तसेच ट्रेंडी अॅक्सेसरीज उपलब्ध करून देत कॅन्टाबिल ने रिटेल अनुभवाला नवे परिमाण दिले आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपले नेतृत्व अधिक दृढ करत कॅन्टाबिल ने आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे.
भारतातील अग्रगण्य अपॅरेल निर्माता आणि रिटेलर कॅन्टाबिल रिटेल इंडिया लिमिटेड ने महाराष्ट्रातील आपली मजबूत उपस्थिती आणखी बळकट केली आहे. पुणे येथे सुरू झालेल्या त्यांच्या 16व्या स्टोअरमुळे हा विस्तार अधिक महत्त्वाचा ठरला आहे. 1035 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात असलेले हे ब्रँड स्टोअर शॉप नं. यूजी02, , एमआयडीसी, पिंपरी कॉलनी, पुणे, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र स्थित आहे. या नवीन स्टोअरच्या उद्घाटनामुळे कॅन्टाबिलच्या विस्तार प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
पुरुषांसाठी कॅज्युअल, पार्टी आणि फॉर्मल वेअरची संपूर्ण रेंज तसेच ट्रेंडी अॅक्सेसरीज उपलब्ध करून देत कॅन्टाबिल ने रिटेल अनुभवाला नवे परिमाण दिले आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपले नेतृत्व अधिक दृढ करत कॅन्टाबिल ने आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे.
नव्या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिक्रिया देताना कॅन्टाबिल रिटेल इंडिया लिमिटेडचे संचालक श्री. दीपक बन्सल, म्हणाले की, स्टोअर सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कॅन्टाबिल ला मिड-प्रिमियम सेगमेंटमध्ये ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या नवीन स्टोअरमध्ये पुरुषांसाठी फॅशन-फॉरवर्ड अपॅरेल आणि अॅक्सेसरीजची विस्तृत रेंज उपलब्ध असेल. भारतभर आमची मजबूत उपस्थिती असून, येत्या काळात आम्ही आमचे रिटेल नेटवर्क आणखी वाढवण्यास कटिबद्ध आहोत.”
कॅन्टाबिलने नेहमीच प्रीमियम कपडे आणि अत्याधुनिक स्टाईल ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहे, जी सतत बदलणाऱ्या फॅशन ट्रेंड्सचे प्रतिबिंब आहे. ब्रँड क्लासिक आणि स्टायलिश अपॅरेल असॉर्टमेंट्स सादर करत राहिला असून, ग्राहकांना अप्रतिम आणि वेगळा फॅशन अनुभव देण्यास तो कायम वचनबद्ध आहे.
कॅन्टाबिलची कहाणी!
2000 पासून कॅन्टाबिल रिटेल इंडिया लिमिटेड ने फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि ग्राहकांना एक स्टायलिश प्रवास दिला आहे. फॅशन क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून आम्ही कॅन्टाबिल या आयकॉनिक ब्रँडखाली पुरुष आणि महिलांसाठी तसेच मुलांसाठीही अपॅरेलची संपूर्ण रेंज सादर केली आहे. मागील 25 वर्षांत कॅन्टाबिल भारतातील अग्रगण्य फॅमिली-वेअर ब्रँड म्हणून विकसित झाला आहे. 2000 मध्ये पुरुषांचे अपॅरेल, 2007 मध्ये महिलांचे वेअर आणि 2018 मध्ये मुलांसाठी आकर्षक कलेक्शन सादर केले. 2023 मध्ये अॅथलीझर वेअर आणि शूज लॉन्च करून कॅन्टाबिल ने आपला पोर्टफोलिओ अधिक विविध केला. शर्ट्स, ट्राउझर्स, डेनिम, सूट्स, ब्लेझर्स, जॅकेट्स यांसारख्या अपॅरेल्ससोबत परफ्यूम्स, वॉलेट्ससारख्या अॅक्सेसरीजही उपलब्ध करून देत कॅन्टाबिल ने ग्राहकांना एक संपूर्ण शॉपिंग अनुभव दिला आहे. मिन्त्रा, अजिओ, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, नायका आणि टाटाक्लिक सारख्या प्रमुख मार्केटप्लेसवर कॅन्टाबिल उपलब्ध आहे. तसेच, Cantabilshop.com वर थेट ब्रँडची ऑफरिंग्स पाहता येतात.
फॅशनला नव्याने परिभाषित करत, प्रत्येक टाक्याने बदल घडवत आमच्या
सोबत या!


