Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंहगड रोड, दत्तवाडी व मुंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक मार्गात बदल*

सिंहगड रोड, दत्तवाडी व मुंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक मार्गात बदल*

 

 

पुणे, दि. ८: सिंहगड, दत्तवाडी व मुंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असून त्याबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर ६, एअरपोर्ट रोड, पुणे यांच्या कार्यालयात २१ सप्टेंबर पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात.

 

 

या बदलांतर्गत भूमकर चौक, सर्व्हिस रस्त्याने स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना व स्वामीनारायण मंदिराकडून भुमकर चौकाकडे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने जाणारा सेवा रस्त्यावर एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. तसेच स्वामीनारायण मंदिराच्या समोरील बाजूस असलेला सेवा रस्ता जोडणाऱ्या पुलावर फक्त भुमकर चौकाकडून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश राहील. स्वामीनारायण मंदिराकडून येणाऱ्या वाहनांना या पुलावर नो एन्ट्री करण्यात येत आहे. वाहनांनी मंदिराच्या डाव्या बाजूकडील सर्विस रोड एकेरी मार्गाचा वापर करून भूमकर चौकाकडे जावे. वाहनांना एकेरी मार्ग करण्यात येत आहे.

 

 

दत्तवाडी वाहतूक विभागाअंतर्गत एस. पी. एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल, सदाशिव पेठ समोरील रस्त्यावर ५० मीटर पी-१ व पी-२ पार्किंग करण्यात येणार आहे. तसेच मुंढवा वाहतूक विभाग अंतर्गत आर्मी गेट व मेरिट सूट येथील राईट टर्न बंद करण्यात येणार आहे, असे पोलीस उप-आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी कळविले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments