Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवासाठी ‘सोलापूर पॅटर्न’चा पुण्यात संवाद* *डीजे मुक्त...

ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवासाठी ‘सोलापूर पॅटर्न’चा पुण्यात संवाद* *डीजे मुक्त सोलापूर मोहिमेचे मुख्य प्रवर्तक सिद्धाराम पाटील यांची यावेळी विशेष मुलाखत १० सप्टेंबर रोजी*

 

 

पुणे : जागरूक पुणेकर नागरिक समितीच्या वतीने ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी, सोलापुरात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती पुणेकरांना देण्यासाठी विशेष संवादाचे आयोजन  करण्यात आले आहे. ‘उत्सव हवेत; कर्णकर्कश आवाज नको! ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवाचा सोलापूर पॅटर्न’ या विषयावर हा संवाद होणार आहे.

 

यामध्ये ज्येष्ठ पत्रकार तथा DJ मुक्त सोलापूर मोहिमेचे मुख्य प्रवर्तक सिद्धाराम पाटील यांची यावेळी विशेष मुलाखत होणार आहे. सोलापुरात संवादातून बदल घडवून आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रयत्नांचा अनुभव ते यावेळी मांडणार आहेत.

 

हा कार्यक्रम गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील केसरी वाडा (लोकमान्य हॉल), नारायण पेठ येथे होणार आहे. सोलापुरात राबविलेला उपक्रम पुण्यातही कसा राबविता येईल, याबाबत यावेळी चर्चा होणार आहे.

 

‘जे सोलापुरात झाले, ते पुण्यातही होणारच!’ असा संदेश देत संघर्षाऐवजी संवादातून ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवाची दिशा ठरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सौरभ वीरकर, निलेश धायरकर आणि अशोक तिडके असून . पुणे इकॉलॉजिकल फाउंडेशन, सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट, लोकशाही जागर मंच, राष्ट्र प्रथम फाउंडेशन, सुराज्य स्वर्गीण प्रकल्प आणि समता प्रतिष्ठान (संदीप मोरे) हे या उपक्रमाचे सहभागी आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments