पुणे : अकारा २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्चरल रूकीज् स्पर्धेत सी. साई लक्ष्मी आणि राघव चव्हाण यांनी सुवर्ण पारितोषिक पटकावले. पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिरंगुट येथे झालेल्या या स्पर्धेत भारतातील सहा राज्यांतील आठ शहरांमधील २५ नामांकित वास्तुकला महाविद्यालयांच्या ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा विषय पोरस सिटी, पोरस आर्किटेक्चर अर्थात मुक्तसंचारी शहरातील बंधनमुक्त वास्तुप्रकल्प असा होता. अकारा अर्थात एशियन कॉन्टेस्ट ऑफ आर्किटेक्चरल रूकीज अवॉर्ड ही वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा असून, या स्पर्धेतील सुवर्ण पारितोषिक विजेत्या दोन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. जपानचे डॉ. याँगिल ली हे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत.
स्पर्धेचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या आर्किटेक्ट सुचिता सयाजी यांनी केले. ज्येष्ठ प्राध्यापक आर्किटेक्ट शेखर गरुड यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. अकारा स्पर्धेद्वारे वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळते. त्यामुळे पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर गेल्या १४ वर्षांपासून ही वार्षिक स्पर्धा आयोजित करत आहे, असे आर्किटेक्ट सुचिता सयाजी यांनी म्हणाले.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. नीरजा लुगानी सेठी, प्रा. कृष्ण कुमार धोटे, डॉ. नबनिता साहा, प्रा. मीनल येर्रामशेट्टी, प्रा. जाई मालपानी आणि आर्किटेक्ट दुश्यंत आशेर यांनी केले.
सुवर्ण पारितोषिक : सी. साई लक्ष्मी सहस्र चित्कोम्मदिन्ना (वाडियार सेंटर फॉर आर्किटेक्चर, म्हैसूर) आणि राघव चव्हाण (रचना संसदचे अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर, मुंबई) यांनी मिळवले. दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच त्यांना अकारा २०२६ च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
रौप्य पारितोषिक : तान्या माहेश्वरी आणि श्रीराम किशोर पलानीवेलू (यूएसएमएस कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट फॉर आर्किटेक्चर अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीज, मुंबई) तसेच सुयश काटकर (विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज् कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई) यांनी मिळवले. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी ७ हजार ५०० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना प्रमाणपत्रे व ट्रॉफी, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. गरिमा बुरागोहैन, प्रा. अनुश्री कुलकर्णी आणि प्रा. हिमाली हरदास यांनी इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने योगदान दिले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड आणि सचिव जितेंद्र पितळीया यांचे मार्ग
दर्शन लाभले.


