Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedआउटडोअर लाईटिंगमध्ये स्टाइल आणि टिकाऊपणाचा संगम;  क्रॉम्पटन ची नवीन वॉलस्माईल आउटडोअर...

आउटडोअर लाईटिंगमध्ये स्टाइल आणि टिकाऊपणाचा संगम;  क्रॉम्पटन ची नवीन वॉलस्माईल आउटडोअर डेको वॉल लाईट रेंज   सादर

नवीन आउटडोअर लाईटिंग रेंजमध्ये आधुनिक डिझाइन, वॉटर रेझिस्टन्स आणि विश्वासार्ह

कार्यक्षमतेचा मिलाफ; आधुनिक बाह्य जागांचे सौंदर्य आणि वातावरण अधिक खुलवण्यासाठी

उपयुक्त

मुंबई, सप्टेंबर १५, २०२६: घराच्या बाहेरील जागा आता घराचा विस्तार म्हणून अधिकाधिक

वापरल्या जात असताना, त्या जागेचे स्वरूप आणि वातावरण ठरवण्यात प्रकाशयोजनेची

भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ग्राहकांच्या या बदलत्या गरजा लक्षात घेऊन, गुणवत्ता आणि

नाविन्यपूर्ण प्रकाशयोजना उपायांसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रॉम्पटन ग्रीव्हज कन्झ्युमर

इलेक्ट्रिकल्स ने आपली नवीन वॉलस्माईल आउटडोअर डेको वॉल लाईट रेंज सादर केली आहे.

आधुनिक सौंदर्य, टिकाऊपणा आणि उपयुक्तता यांचा संगम साधण्यासाठी डिझाइन केलेली ही

रेंज आधुनिक बाह्य जागांसाठी प्रीमियम लाईटिंग अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली

आहे.

आजचे ग्राहक आपल्या परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तसेच विश्वासार्ह कार्यक्षमता

देणाऱ्या आउटडोअर लाईटिंग सोल्युशन्सचा शोध घेत आहेत. ही गरज लक्षात घेऊन क्रॉम्पटन

ची वॉलस्माईल आउटडोअर डेको वॉल लाईट रेंज आधुनिक डिझाइनसोबत आउटडोअर

वापरासाठी आवश्यक वैशिष्ट्ये प्रदान करते. त्यामुळे विविध जागांचे वातावरण, सौंदर्य आणि

कार्यक्षमता अधिक प्रभावीपणे वाढवता येते. ही रेंज बाल्कनी, पोर्च, पूलसाइड एरिया, लॉबी,

पार्किंग स्पेस तसेच अॅक्सेंट आणि डिस्प्ले लाईटिंगसाठी उपयुक्त आहे.

क्रॉम्पटन च्या वॉलस्माईल आउटडोअर डेको वॉल लाईट रेंज

मध्ये ग्राहकांचा एकूण लाईटिंग अनुभव अधिक आकर्षक करणाऱ्या विविध उत्पादनाचा

समावेश आहे:

वॉलस्माईल लिनीया : आकर्षक आणि स्लीक सिलिंड्रिकल आकार असलेली लिनीया

आउटडोअर भिंतींना आधुनिक आणि देखणा लूक देते. ही ६वॅट वॉल लाईट आधुनिक बाह्य

रचनेला पूरक ठरण्यासोबतच सजावटीचा सूक्ष्म स्पर्श देते.

• वॉलस्माईल नेक्सो : राउंड आणि स्क्वेअर अशा दोन्ही आकारांमध्ये उपलब्ध असलेली नेक्सो

आधुनिक आउटडोअर जागांना समकालीन लूक देते. ही ५वॅट वॉल लाईट बाह्य जागांच्या

सौंदर्यात भर घालताना स्वच्छ आणि सुसंस्कृत लूक कायम ठेवते.

 

• वॉलस्माईल प्रिझम : ठळक आणि लांबट प्रोफाइलमुळे प्रिझम आउटडोअर भिंतींवर आकर्षक

आणि आधुनिक प्रभाव निर्माण करते. ही ४वॅट वॉल लाईट वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि

प्रीमियम लूक यांचा संगम साधते. त्यामुळे प्रकाशयोजना ही सजावटीचाही महत्त्वाचा भाग

असलेल्या जागांसाठी ती योग्य ठरते.

• वॉलस्माईल हॅलो : मोहक ओव्हल आकाराची हॅलो प्रकाश आणि सावल्यांचा सुंदर समतोल

निर्माण करते, ज्यामुळे बाहेरील परिसर अधिक आकर्षक दिसतो. ही ५वॅट वॉल लाईट आधुनिक

बाह्य रचनेला सजावटीचा समकालीन स्पर्श देते.

आउटडोअर लाईटिंगचा एकूण अनुभव अधिक प्रभावी करण्यासाठी वॉलस्माईल आउटडोअर

डेको वॉल लाईट रेंज

मध्ये आधुनिक डिझाइनसोबत बाह्य वातावरणात विश्वासार्ह कार्यक्षमतेला पूरक वैशिष्ट्ये

देण्यात आली आहेत. ही रेंज IP54 संरक्षणासह वॉटर रेझिस्टंट असून 3kV पर्यंतचे सर्ज

प्रोटेक्शन प्रदान करते. यासोबतच आकर्षक बिल्ड आणि सोपी इन्स्टॉलेशन सुविधा देण्यात

आली आहे. उत्पादनांमध्ये No UV/IR, CRI >80, दीर्घकाळ टिकणारी कार्यक्षमता आणि BIS

Registration यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या रेंजसोबत एक वर्षाची वॉरंटी देखील देण्यात येते.

या सर्व वैशिष्ट्यांमुळे आउटडोअर लाईटिंगमध्ये सौंदर्य, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता यांचा

उत्तम समतोल साधला जातो.

लॉन्चबद्दल बोलताना

क्रॉम्पटन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड चे बिझनेस युनिट हेड – लाईटिंग, सोलर

रूफटॉप आणि वायर्स  चे श्री. शालीन नायक म्हणाले की क्रॉम्पटन मध्ये आमचा विश्वास आहे

की, लाईटिंगचे काम केवळ जागा प्रकाशित करण्यापुरते मर्यादित नसून, त्या जागेचे सौंदर्य,

वातावरण आणि अनुभव अधिक समृद्ध करण्याचेही असते. आधुनिक घरांमध्ये आउटडोअर

जागांचे महत्त्व वाढत असताना, ग्राहकांना डिझाइन, कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यांचा मेळ

साधणारे लाईटिंग सोल्युशन्स अपेक्षित आहेत.

वॉलस्माईल आउटडोअर डेको वॉल लाईट रेंज च्या माध्यमातून आम्ही आधुनिक सौंदर्य आणि

विश्वासार्ह आउटडोअर कार्यक्षमता यांचा संगम साधला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या बाह्य

जागांना पूरक ठरणारी लाईटिंग सोल्युशन्स आम्ही सादर केली आहेत. ग्राहकांच्या बदलत्या

गरजांना प्रतिसाद देणारी आणि त्यांच्या दैनंदिन जागांना अधिक मूल्य देणारी विचारपूर्वक

तयार केलेली लाईटिंग सोल्युशन्स विकसित करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे

लॉन्च प्रतीक आहे.”

वॉलस्माईल आउटडोअर डेको वॉल लाईट रेंज भारतभरातील क्रॉम्पटन

-अधिकृत रिटेल आउटलेट्स तसेच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल.

 

उत्पादनांची किंमत

 उत्पादन| वॅटेज| एमआरपी

 वॉलस्माईल हॅलो | ५वॅट | ₹१०००

 वॉलस्माईल प्रिझम | ४वॅट |₹२०००

 वॉलस्माईल नेक्सो | ५वॅट | ₹१२००

 वॉलस्माईल लिनीया | ६वॅट ₹१५००

आधुनिक डिझाइन, आउटडोअर वापरासाठी उपयुक्त वैशिष्ट्ये आणि प्रीमियम सौंदर्य यांचा

मिलाफ असलेली वॉलस्माईल आउटडोअर डेको वॉल लाईट रेंज , ग्राहकांना त्यांच्या बाहेरील

जागांचे सौंदर्य, वातावरण आणि कार्यक्षमता अधिक प्रभावीपणे वाढवण्याचा स्टायलिश पर्याय

उपलब्ध करून देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments