पुणे, 15 सप्टेंबर 2026: टीव्हीएस वेणूचा एक भाग आणि दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या निर्मितीमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या टीव्हीएस मोटरने TVS iQube च्या ग्राहकांच्या वाढत्या संख्येचा आनंद साजरा केला. यासाठी आज पुण्यात एक मेगा डिलिव्हरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एका दिवसात TVS iQube MillionR स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कूटर्स 100 हून अधिक ग्राहकांना वितरीत करण्यात आल्या, 25 ऑगस्ट रोजी लॉन्च केल्यानंतर अल्पावधीतच या नवीन लाँच झालेल्या एडिशनला मिळालेला हा जोरदार प्रतिसाद आहे. 10 लाखांहून अधिक TVS iQube स्कूटर्स रस्त्यावर धावत असल्याचा महत्त्वाचा टप्पा गाठल्याच्या आनंदात MillionR स्पेशल एडिशन सादर करण्यात आली आहे.
TVS iQube द्वारे इलेक्ट्रिक मोबिलिटीचा स्वीकार करणाऱ्या दहा लाखांहून अधिक ग्राहकांच्या विश्वासातून प्रेरणा घेऊन, MillionR Edition हा एक महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करत आहे आणि त्याच वेळी भारताची पसंतीची फॅमिली ईव्ही (EV) म्हणून या स्कूटरचे स्थान अधिक मजबूत करते आहे. टीव्हीएस मोटरच्या ईव्ही पोर्टफोलिओमधील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून, TVS iQube ने इलेक्ट्रिक दुचाकींच्या श्रेणीत कंपनीचे नेतृत्व बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे; तसेच, या वर्षी बाजार हिश्शानुसार टीव्हीएस मोटरला पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवून देण्यातही तिचे योगदान आहे.
MillionR Edition ही स्कूटर डिझाइन, तंत्रज्ञान आणि दैनंदिन सोयींचा सुरेख संगम साधत, दहा लाख TVS iQube च्या टप्प्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण नवीन रूप सादर करते. 3.5 kWh व्हेरिएंटवर आधारित असलेल्या या आवृत्तीमध्ये नॉर्दर्न लाइट्स पासून प्रेरित असा नवीन ऑरोरा ग्रीन ड्युअल टोन रंग, प्रीमियम सीट अपहोल्स्ट्री, खास MillionR बॅजिंग आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्राफिक्स यांचा समावेश आहे. हे सर्व घटक MillionR Edition ला एक वेगळी ओळख देतात आणि त्याच वेळी, टीव्हीएस iQube ला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणाऱ्या त्या दहा लाख ग्राहकांच्या विविध प्रवासांचे तसेच अनुभवांचे सेलिब्रेशन करतात.
टीव्हीएस आयक्यूब मिलियनआर स्पेशल एडिशन दैनंदिन वापरासाठी अधिक सोयीची आहे. यात समोरच्या बाजूला एक युटिलिटी स्टोरेज कंपार्टमेंट आहे, ज्यामुळे स्कूटरची एकूण साठवण क्षमता 32 लिटरवरून 35.5 लिटरपर्यंत वाढते. सोबतच यात एक इंटिग्रेटेड यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील आहे. स्कूटरमध्ये 3.5 kWh क्षमतेची बॅटरी कायम ठेवण्यात आली आहे, ती 145 किमीची आयडीसी रेंज देते आणि 118 पेक्षा जास्त कनेक्टेड टेक्नॉलॉजी फीचर्सने सुसज्ज आहे.
पुण्यातील मेगा डिलिव्हरी इव्हेंटने हा महत्त्वाचा टप्पा प्रत्यक्षात आणला, जिथे ग्राहक आणि त्यांचे कुटुंबीय इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे झालेल्या त्यांच्या संक्रमणाचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र आले. या इव्हेंटमध्ये इंटरॅक्टिव्ह अनुभव, आकर्षक उपक्रम, ग्राहकांना बक्षिसे जिंकण्याची संधी आणि ग्राहक डिलिव्हरीचा एक आनंदी अनुभव यांचा समावेश होता.
टीव्हीएस आयक्यूब मिलियनआर स्पेशल एडिशनची किंमत ₹1,40,710 (प्रभावी एक्स-शोरूम, महाराष्ट्र) इतकी आहे. टीव्हीएस iQube ची श्रेणी ₹1,13,087 (प्रभावी एक्स-शोरूम, महाराष्ट्र) पासून सुरू होते, तर BaaS (बॅटरी ॲज अ सर्व्हिस) अंतर्गत किंमती ₹59,999 पासून सुरू होतात.
*******


