Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorized*ऑटोरिक्षा परवान्यांसाठी मुदतवाढ*

*ऑटोरिक्षा परवान्यांसाठी मुदतवाढ*

 

 

पुणे, दि. १५ : परवाना बंदीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी ऑटोरिक्षा व टॅक्सींच्या इरादापत्र तसेच बदली वाहनांच्या नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

दि. १ जानेवारी २०२६ किंवा त्यानंतर १८० दिवसांची मुदत संपलेल्या इरादापत्रांना, दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज केल्यास, एकवेळची १८० दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे. दि. ९ मार्च २०२६ पर्यंत नोंदणीसाठी सादर केलेल्या, मात्र नोंदणी क्रमांक न मिळालेल्या प्रकरणांनाही ही मुदतवाढ लागू राहणार आहे.

 

तसेच, बदली वाहनांच्या नोंदणीसाठी दि. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर २०२६ नंतर रिप्लेसमेंट घेणाऱ्या परवानाधारकांना रिप्लेसमेंटच्या दिनांकापासून कमाल एक वर्षाची मुदत मिळणार आहे. निर्धारित मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित परवाने रद्द करण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments