Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या बहुप्रतिक्षित इंटेलिजंट एसयूव्हीच्या नावाची घोषणा केली

ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या बहुप्रतिक्षित इंटेलिजंट एसयूव्हीच्या नावाची घोषणा केली

गुरुग्राम | सप्टेंबर १४, २०२६: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) आज आपली बहुप्रतिक्षित आगामी इंटेलिजंट एसयूव्हीए ह्युंदाई बेयॉनच्या नावाची घोषणा केली. ह्युंदाईची नवीन जागतिक एसयूव्ही बेयॉन भारतातील ह्युंदाईसाठी उत्साहवर्धक नवीन अध्यायाची सुरुवात आहे.

 

एचएमआयएलच्या एसयूव्ही श्रेणीतील नवीन भर म्हणून, ह्युंदाई बेयॉन इंटेलिजंट मोबिलिटीच्या नवीन दृष्टिकोनाला सादर करते, जिथे नाविन्यता, अभिव्यक्ती आणि भावना स्पष्ट हेतूने एकत्र येतात. बदलत्या भारतासाठी डिझाइन केलेल्या या नवीन एसयूव्हीमधून ह्युंदाईची जागतिक डिझाइन आणि उत्पादन तत्त्वज्ञान दिसून येते, तसेच नव्या पिढीतील ग्राहकांसाठी इंटेलिजंट अनुभव घेऊन येते.

 

आगामी एसयूव्हीच्या नावाच्या अनावरणाबाबत मत व्यक्त करत एचएमआयएलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ तरुण गर्ग म्हणाले, “ह्युंदाई बेयॉनच्या माध्यमातून आम्ही केवळ नवीन एसयूव्हीपेक्षा अधिक काही सादर करत आहोत. बेयॉन नव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करते, जी आमच्या ग्राहकांसाठी इंटेलिजंट, सर्वोत्तम आणि अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्याची आमची महत्त्वाकांक्षा दर्शवते. ह्युंदाईमध्ये, आमचा व्यक्तींचे जीवन समृद्ध करणारे मोबिलिटी अनुभव निर्माण करण्याच्या आमच्या प्रेरणेतून प्रत्येक नवीन उत्पादन स्वतःला अधिक पुढे नेण्याची एक संधी आहे, असा विश्वास आहे. बेयॉनसह आम्ही पुन्हा एकदा महत्त्वाच्या बारीक घटकांमध्ये परिपूर्णता साधण्याचे आव्हान स्वीकारले आहे. तसेच आम्ही तंत्रज्ञान सहज आणि ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात अखंडपणे सामावून जाते, तेव्हाच त्याचे सर्वात मोठे मूल्य निर्माण होते या आमच्या विश्वासाशी बांधील आहोत. आम्ही येत्या काही आठवड्यांत भारतासोबत ह्युंदाई बेयॉनबद्दल अधिक माहिती शेअर करण्यासाठी उत्सुक आहोत.”

 

तंत्रज्ञान आणि कथाकथनाची सांगड घालत, ह्युंदाई बेयॉनच्या नाव जाहीर करणाऱ्या जाहिरातीने भविष्यवेधी जग उभे केले आहे, जिथे बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांचा संगम होतो. नेक्स्टजनरेशन लॅबच्या अचूकतेपासून प्रेरित होऊन ही जाहिरात अनेक इंटेलिजंट घटकांचा मागोवा घेते, जे एकापाठोपाठ एक एकत्र येऊन बेयॉन हे नाव तयार करतात, ज्यामधून एका प्रगत बुद्धिमत्तेचा उदय आणि ह्युंदाईचे धाडसी डिझाइन, तंत्रज्ञान व नाविन्यतेची एक नवीन अभिव्यक्ती दिसून येते. या जाहिरातीचा समारोप एका साध्या पण प्रभावी विचाराने होतो: इंटेलिजन्स ऑन.

 

ह्युंदाई बेयॉन या नावामागील प्रेरणा काय आहे?

 

बेयॉन हे नाव फ्रेंच बास्क प्रदेशातील बायोन शहरापासून प्रेरित आहे, जे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि गतिमान वृत्तीसाठी ओळखले जाते. हे नाव ह्युंदाईच्या जागतिक डिझाइन तत्त्वज्ञानाला प्रतिबिंबित करते, तसेच उत्साहाची भावना आणि साहसाचा नवीन उत्साह घेऊन बदलत्या भारतासाठी डिझाइन केलेल्या नवीन एसयूव्हीच्या आगमनाला सादर करते.

 

ही घोषणा ह्युंदाई बेयॉनच्या प्रवासातील पहिल्या अध्यायाची सुरुवात ठरते, आगामी दिवसांत या इंटेलिजंट एसयूव्हीबद्दल अधिक तपशील जाहीर के

ले जातील.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments