Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedरब्बी हंगाम २०२६-२७: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्जांचे आवाहन*

रब्बी हंगाम २०२६-२७: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्जांचे आवाहन*

 

पुणे, दि. १७: रब्बी हंगामातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य व व्यापारी पिके, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियान योजनेअंतर्गत ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, करडई पिकांचे पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण, मिनीकिट व ऊस पिकातील फ्लेक्झी घटकांतर्गत सुपरकेन नर्सरी या घटकांचा लाभ देण्यात येणार आहे, याचा अधिकाअधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

 

योजनेकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षʼ असल्यामुळे महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, तरी अधिकाधिक महिला शेतकरी खातेदारांनी महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.

 

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखत्र (फार्मर आयडी) असणे बंधनकारक असून https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुढील दोन वर्षे लाभ दिला जाणार नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर, पुणे व सोलापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जेजुरकर यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments