मुंबई,18 सप्टेंबर 2026 : व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींच्या संघर्षाच्या कथा अनेकांना प्रेरणा देतात. नुकतेच बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर यांनी पीएनजी ज्वेलर्स चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ यांच्या चुजिंग गोल्ड या पहिल्या पुस्तक व आत्मचरित्राचे व त्यात मांडलेल्या अंर्तदृष्टीचे कौतुक केले. पुस्तकाची प्रत स्वतः लेखक डॉ.सौरभ गाडगीळ यांनी रणबीर कपूर यांना भेट दिली.
पेंग्विन रँडम हाऊस इंडिया तर्फे देशभरात प्रकाशित करण्यात आलेले चुजिंग गोल्ड हे पीएनजी ज्वेलर्सच्या 194 वर्षांच्या वारशासोबत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांची विचारसरणी आणि नेतृत्वाचा प्रवास उलगडते. पुस्तकाच्या आशयाने प्रभावित झालेल्या रणबीर कपूर यांनी पुस्तक सखोलपणे वाचण्याची उत्सुकता व्यक्त केली. वारसा, घेतलेले निर्णय, कठीण प्रसंग, अपयशातून मिळालेले धडे आणि अडचणींवर मात करण्याचा प्रवास यांचे प्रामाणिक चित्रण या पुस्तकात अधोरेखित केले असल्याचे त्यांनी नमूद केले. रणबीर कपूर यांना आत्मचरित्रे आणि वास्तव जीवनातील कथा वाचण्याची विशेष आवड आहे.
पीएनजी ज्वेलर्स चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, चुजिंग गोल्ड लिहिताना मला माझ्या भूतकाळाकडे आजच्या स्पष्टतेच्या नजरेतून पुन्हा पाहण्याचा मोह टाळायचा होता. प्रत्येक क्षणी मला जे माहीत होते आणि जे मी अनुभवले, त्यातील प्रामाणिकपणा पुस्तकात जपायचा होता,अशी माझी इच्छा होती. आज मागे वळून पाहताना दिसणारी अधिक सुस्पष्टता त्यात मांडायची नव्हती. रणबीरसोबत या पुस्तकाविषयी चर्चा करताना अतिशय अर्थपूर्ण संवाद साधता आला. आमची कार्यक्षेत्रे खूप वेगळी आहेत; मात्र वारशाची जबाबदारी आणि कठीण मार्ग निवडताना होणारी अस्वस्थता या दोन्ही गोष्टी आमच्या आयुष्यात समान असल्याचे जाणवले. हे पुस्तक वाचून एखाद्या वाचकाने थोडे अधिक धैर्य दाखवून पुढचा अधिक कठिण निर्णय घेण्यास समर्थता दर्शविली, तरी या पुस्तकाने आपले उद्दिष्ट साध्य केले असे मी समजेन.
पुस्तकाबद्दल आपले विचार व्यक्त करताना रणबीर कपूर म्हणाले की, मला आत्मचरित्रे आणि वास्तव जीवनातील कथा वाचायला आवडतात. कारण उत्तम कथा केवळ एखाद्या व्यक्तीने काय साध्य केले हे सांगत नाहीत, तर त्यासाठी त्यांना काय किंमत मोजावी लागली आणि कोणती जोखीम पत्करावी लागली, हेही ती पुस्तके उलगडून दाखवतात. चुजिंग गोल्ड ने माझे लक्ष लगेच वेधून घेतले आणि या पुस्तकाचे शीर्षकच सर्व काही सांगून जाते. ही केवळ एका मोठ्या यशाची कथा नाही; तर सुरक्षित पर्याय उपलब्ध असतानाही वारंवार घेतलेल्या कठीण आणि जाणीवपूर्वक निर्णयांची ही गोष्ट आहे. सौरभ यांनी अपयशाचे ज्या पद्धतीने वर्णन केले आहे, त्यामुळे मी सर्वाधिक प्रभावित झालो. अपयशाकडे त्यांनी केवळ यशापूर्वीची एक गोष्ट न समजता, आपल्या अंत:प्रेरणेला आकार देणारी गोष्ट आहे. आत्मचरित्राच्या प्रकारात हे पुस्तक खरोखरच दुर्मिळ आहे. अशा प्रकारचा वारसा निर्माण करणे म्हणजे एका क्षणी आलेल्या दूरदृष्टीचा परिणाम नव्हे; तर समोर सोपा मार्ग उपलब्ध असतानाही पुन्हा पुन्हा कठीण मार्ग निवडणे आहे. व्यवसाय क्षेत्र असो वा नसो ही विचारसरणी या पुस्तकाला वाचनीय बनवते.
चुजिंग गोल्ड हे पुस्तक आर्थिक आकडेवारीच्या पलीकडे जाऊन नेतृत्व, जिद्द आणि आव्हानांना सामोरे जाण्याचा वास्तववादी दृष्टीकोनाचे दर्शन घडवते. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या उपस्थितीत मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक आता पीएनजी ज्वेलर्सच्या स्टोअर्समध्ये,pngjewellers.com, ॲमेझॉन तसेच देशभरातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
रणबीर कपूर आणि माधुरी दीक्षित हे दोघेही पीएनजी ज्वेलर्सचे ब्रँड ॲम्बेसेडर आ
हेत.


