Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रिजस्टोन इंडिया’च्या वतीने हिंजवडी फाटा, पुणे येथे न्यू सिलेक्ट स्टोअर सुरू

ब्रिजस्टोन इंडिया’च्या वतीने हिंजवडी फाटा, पुणे येथे न्यू सिलेक्ट स्टोअर सुरू

 

 

पुणे (19 सप्टेंबर, 2026): ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन, जपानची समूह कंपनी ब्रिजस्टोन इंडिया’च्या वतीने पुण्यात नवीन ब्रिजस्टोन सिलेक्ट स्टोअरचे उदघाटन करण्यात आले. ज्यामुळे शहरातील किरकोळ विक्री आणखी मजबूत झाली.

द सिलेक्ट स्टोअर, दीपराज टायर्स, तळमजला, Sr.No. 156/8, दुकान क्रमांक. 13, हिंजवडी फाटा/वाकड ब्रिज, पुणे या पत्त्यावर आहे. ब्रिजस्टोन सिलेक्ट स्टोअर्सची रचना ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण टायर आणि व्हील केअरचा अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. प्रीमियम टायरसह, ग्राहक तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आधुनिक उपकरणे आणि सुरक्षा, आरामदायी तसेच दीर्घकालीन कामगिरीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सेवांची अपेक्षा करू शकतात.

“ब्रिजस्टोनसाठी पुणे ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. शहरात हे सिलेक्ट स्टोअर उघडणे ग्राहकांना प्रीमियम उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण चांगला अनुभव देऊन दीर्घकालीन संबंध निर्माण करण्याकडे आमचे लक्ष केंद्रित आहे”, असे ब्रिजस्टोन इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंग, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राजीव शर्मा म्हणाले.

या उदघाटनासह, ब्रिजस्टोन इंडिया पुणे आणि महाराष्ट्रात आपली उपस्थिती आणखी मजबूत करत आहे. ज्यामुळे या प्रदेशातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाच्या टायर सोल्यूशन्सच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद मिळतो आहे. प्रवासी वाहन मालकांसाठी टायर तसेच संबंधित सेवांसाठी हे दुकान सोयीस्कर, एकाच छताखाली सर्वकाही अर्थात वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून काम करेल.

नव्याने उघडण्यात आलेल्या स्टोअरमध्ये ब्रिजस्टोनची अद्ययावत प्रीमियम टायर रेंज उपलब्ध असेल. ज्यात अधिक आराम, कार्यक्षमता आणि ईव्ही सज्जतेसाठी ENLITEN तंत्रज्ञानासह विकसित केलेली Turanza 6i आणि ऑन-रोड त्याचप्रमाणे ऑफ-रोड अशा दोन्ही परिस्थितींमध्ये विश्वासार्ह कामगिरी शोधणाऱ्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय पर्याय असलेल्या ड्युएलर ऑल-टेरेन ए/टी002 चा समावेश आहे. या दुकानात संरेखन (अलाइनमेंट), संतुलन (बॅलन्स), नायट्रोजन भरणे आणि टायर बदलणे देखील उपलब्ध आहे.

 

ब्रिजस्टोन इंडियाबद्दल

ब्रिजस्टोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनची समूह कंपनी आहे, जी सुरक्षित आणि शाश्वत गतिशीलतेसाठी उपाय उपलब्ध करण्याच्या कौशल्यावर टायर आणि रबर बांधणीमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे मुख्यालय असलेली ही कंपनी 3000 हून अधिक लोकांना रोजगार देते आणि जगभरातील लोकांची फिरण्याची, जगण्याची, काम करण्याची आणि खेळण्याची पद्धत सुधारत, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे समर्थित प्रीमियम टायर आणि प्रगत उपायांचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ ऑफर देऊ करते.

 

ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनविषयी:

रक्षित आणि शाश्वत गतिशीलतेसाठी उपाय उपलब्ध करण्याच्या त्याच्या कौशल्यावर ब्रिजस्टोन टायर आणि रबर बांधणीमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. टोकियो येथे मुख्यालय असलेली ही कंपनी जागतिक स्तरावर अंदाजे 1,30,000 लोकांना रोजगार देते आणि जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये व्यवसाय करते. ब्रिजस्टोन प्रीमियम टायर्सचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे समर्थित प्रगत उपाय उपलब्ध करून देते. ज्यामुळे जगभरातील लोकांची हालचाल, जीवन जगणे, काम करणे आणि खेळण्याची पद्धत सुधारते.

 

ब्रिजस्टोन समुहाने “ब्रिजस्टोन ई8 कमिटमेंट” ही आपली कॉर्पोरेट बांधिलकी स्थापित केली. जेणेकरून त्याला त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईलः “2050 पर्यंत, ब्रिजस्टोन एक शाश्वत समाधान कंपनी म्हणून सामाजिक मूल्य आणि ग्राहक मूल्य देत राहील”. ही बांधिलकी भावी पिढ्यांचा विश्वास संपादन करताना व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी समूहाचा अक्ष म्हणून काम करेल. ‘ब्रिजस्टोन ई8 कमिटमेंट’ मध्ये ‘ई’ अक्षराने (ऊर्जा, पर्यावरणशास्त्र, कार्यक्षमता, विस्तार, अर्थव्यवस्था, भावना, सुलभता आणि सक्षमीकरण) सुरू होणारी आठ अद्वितीय ब्रिजस्टोन मूल्ये आहेत, जी समूह, कर्मचारी, समाज, भागीदार आणि ग्राहकांसह एकत्रितपणे ब्रिजस्टोन उद्दिष्टे आणि प्रक्रियांद्वारे निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असेल, जेणेकरून शाश्वत समाज घडविण्यात मदत होईल.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments